घरक्रीडाBCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांची ICC च्या अध्यक्षपदी निवड

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांची ICC च्या अध्यक्षपदी निवड

Subscribe

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे (BCCI) चे अध्यक्ष सौरव गांगुली यांची आयसीसी (ICC) पुरूष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे (BCCI) चे अध्यक्ष सौरव गांगुली यांची आयसीसी (ICC) पुरूष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या अगोदर या पदावर भारतीय कसोटी संघाचे माजी कर्णधार आणि गांगुली यांचे माजी सहकारी अनिल कुंबळे होते. अनिल कुंबळेची २०१६ साली वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार क्लाईव्ह लॉयड यांच्या जागी २०१२ साली पुरूष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. २०१६ साली कुंबळेंना या पदाबाबत मुदतवाढ देण्यात आली होती. कुंबळे या पदावर ९ वर्षे कार्यरत होते. तीन तीन वर्षाच्या एकूण तीन टर्म त्यांनी पूर्ण केल्यामुळे ते या पदावर अधिक काळ राहू शकत नसल्याने सौरव गांगुली यांच्याकडे या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

- Advertisement -

BCCI ला होणार फायदा

सौरव गांगुली यांची आयसीसीच्या पुरूष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी निवड केल्याने बीसीसीआयसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण २०२४ ते २०३१ या कालावधीत भारतामध्ये ३ आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा होणार आहेत. २०२६ मधील टी-२० विश्वचषक, २०२९ मधील चॅम्पियन्य ट्रॉफी आणि २०३१ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय किताबाचा यात समावेश आहे. या तीनही मोठ्या स्पर्धा भारतात होणार आहेत आणि अशातच बीसीसीआय अध्यक्ष यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही बीसीसीआयसाठी आनंदाची बातमी आहे. तर या स्पर्धांसाठी आयसीसी भारत सरकारला १० टक्के कर देणार आहे आणि साहजिकच याच्यामुळे बीसीसीचे १५०० कोटी वाचणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ESPNcricinfo (@espncricinfo)

- Advertisement -

२०१६ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात आणि २०२३ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या आयोजनात बीसीसीआयचे एकूण ७५० कोटी नुकसान होणार आहे. माहितीनुसार अन्य देशातील क्रिकेट बोर्डांना सरकारने करामध्ये सवलत दिली आहे. मात्र बीसीसीआयला सवलत न दिल्याने नुकसान होत होते. लक्षणीय बाब म्हणजे नुकताच पार पडलेला टी-२० विश्वचषक भारतात न होता यूएईमध्ये पार पडला. अन्यथा बीसीसीआयचे आणखी नुकसान झाले असते.


हे ही वाचा: http://Commonwealth championship : प्रसुतीनंतर ९२ किलो वजन झाले, पण इंटरनॅशनल कमबॅकची जिद्द सोडली नाही


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -