घरक्रीडाकसोटी पदार्पणाला ५० वर्षे पूर्ण; बीसीसीआयने केला गावस्करांचा सन्मान  

कसोटी पदार्पणाला ५० वर्षे पूर्ण; बीसीसीआयने केला गावस्करांचा सन्मान  

Subscribe

गावस्कर यांनी ६ मार्च १९७१ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

भारताचे माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या कसोटी पदार्पणाला शनिवारी ५० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गावस्कर यांचा सन्मान केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामना पार पडला. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकदरम्यान बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी गावस्कर यांना ‘टेस्ट कॅप’ देत त्यांचा सन्मान केला. जागतिक क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असणाऱ्या गावस्कर यांनी ६ मार्च १९७१ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

- Advertisement -

कसोटी क्रिकेटमध्ये ३४ शतके

गावस्कर यांनी आपल्या पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावांत त्यांनी अर्धशतके (६५ आणि ६७) केली होती. त्यांनी एकूण १२५ कसोटी आणि १०८ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे १०,१२२ आणि ३,०९२ धावा केल्या. तसेच त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ३४ शतके झळकावली आणि कसोटीत सर्वाधिक शतकांचा विक्रम बरीच वर्षे त्यांच्या नावे होता. परंतु, २००५ मध्ये सचिन तेंडुलकरने त्यांचा हा विक्रम मोडला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -