घरक्रीडाVirat Kohli vs BCCI: विराट कोहलीच्या 'त्या' वक्तव्यावर BCCIची बोलती बंद, नाहीतर...

Virat Kohli vs BCCI: विराट कोहलीच्या ‘त्या’ वक्तव्यावर BCCIची बोलती बंद, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

Subscribe

भारताचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली होती. कारण विराट एकदिवसीय मालिकेत खेळणार नाही. अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात होत्या. त्यामुळे विराटने पत्रकार परिषद घेत सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण देत आपली भूमिका मांडली होती. परंतु दुसरीकडे भारतीय नियामक मंडळ (BCCI) या सर्व गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी विचार करत आहे. कसोटी मालिकेआधी कोणत्याही प्रकारच्या त्रुटी किंवा अडचण यामध्ये येऊ नये, यासाठी बोर्डाकडून विशेष लक्ष दिलं जाणार आहे.

विराट कोहली विरूद्ध बीसीसीआय

भारताचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्याआधीच एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी विराट म्हणाला की, मी कधीही टी-२० मालिकेतून कर्णधारपद सोडणार नाही. असं म्हटलेलंच नाहीये. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मिडियाशी संवाद साधला होता. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला देखील विराटने पलटवार केला होता. अशा प्रकारच्या घटना क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळतात. बुधवारी जो नाट्यमय प्रकार घडला. तो बीसीसीआयला अजिबात आवडलेला नाहीये. मात्र, यावर त्वरीत प्रतिक्रिया देणे योग्य नाहीये, अशी बीसीसीआयची भूमिका आहे.

- Advertisement -

मी सार्वजनिकरित्या भाष्य करणार नाही

विराट कोहली काल (गुरूवार) दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे.विराट कोहली टीम इंडियासह द.आफ्रिकेत पोहोचला आहे. येथे दोन्ही संघादरम्यान तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. परंतु कोलकाता बोर्डाचे अध्यक्ष यांनी सांगितलं की, मी सार्वजनिकरित्या भाष्य करणार नाही. कोणतही वक्तव्य किंवा पत्रकार परिषद मी घेणार नाहीये. बीसीसीआय यावर लक्ष देईल. असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले. कर्णधार आणि अध्यक्षांनी एकत्र बसून यावर सविस्तर चर्चा करणं महत्त्वाचं आहे. परंतु गांगुली यावर कर्णधारसोबत चर्चा करण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जात आहे.


हेही वाचा : OBC Reservation : इम्पेरिकल डाटाबाबत सरकार असत्य बोलतंय, कोंडी करण्याचा प्रयत्न – छगन भुजबळ

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -