घरक्रीडासाहाला धमकवणं पत्रकार मजुमदारांना पडलं महागात; बीसीसीआयने घातली दोन वर्षांची बंदी

साहाला धमकवणं पत्रकार मजुमदारांना पडलं महागात; बीसीसीआयने घातली दोन वर्षांची बंदी

Subscribe

भारताच्या कसोटी संघाचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाला धमकीचे मेसेज पाठवणारे ज्येष्ठ पत्रकार बोरिय मजुमदार यांच्यावर बीसीसीआयने दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. मुलाखतीसाठी नकार दिल्याबद्दल मजुमदार यांनी साहावर शब्दीक टीका केली होती.

भारताच्या कसोटी संघाचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाला धमकीचे मेसेज पाठवणारे ज्येष्ठ पत्रकार बोरिय मजुमदार यांच्यावर बीसीसीआयने दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. मुलाखतीसाठी नकार दिल्याबद्दल मजुमदार यांनी साहावर शब्दीक टीका केली होती. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सर्व राज्य युनिट्सना त्याला स्टेडियममध्ये परवानगी देऊ नये म्हणून कळवत आहे. त्याला घरच्या सामन्यांसाठी मीडिया मान्यता दिली जाणार नाही आणि आम्ही त्याला काळ्या यादीत टाकण्यासाठी आयसीसीला पत्र देखील लिहिले आहे. या प्रकरणी चौकशीसाठी बीसीसीआयने तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती.

नेमकं प्रकरण काय?

- Advertisement -

भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेआधी वृद्धिमान साहाच्या फॉर्मची चांगलीच चर्चा रंगली होती. त्याच्या फॉर्मवरून सतत प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. साहाला निवृत्त होण्याचा सल्लाही बीसीसीआयमधून दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याला श्रीलंका मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले. या सर्व प्रकारावर मुलाखत देण्यास साहाने बोरिया मजुमदार यांना नकार दिला होता. त्यावेळी, मजुमदार यांनी साहाला मेसेज करून धमकी दिली होती आणि साहाने त्या मेसेजचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट केले.

वृद्धिमान साहाचे हे प्रकरण 19 फेब्रुवारीला समोर आले. साहाने ट्विट केलेल्या फोटोंमध्ये बोरिया मजुमदार हे वृद्धिमान साहा याला मुलाखत देण्यासाठी जबरदस्ती करत असताना त्याने धमकावत असल्याचे दिसून आले. वृद्धिमान साहाला सांगितले की, “तू मला कॉल बॅक केला नाहीस. मी परत कधीही तुझी मुलाखत घेणार नाही. आणि हा मी माझा अपमान समजतो. मी माझा अपमान कधीही विसरत नाही. तू हे करायला नको होतंस”, असे मेसेज मजुमदार यांनी केले होते. साहाने हे मेसेज सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

- Advertisement -

बीसीसीआयने हे प्रकरण गांभीर्याने घेताना साहा व मजुमदार या दोघांचेही बोलणे ऐकून घेतले. त्यानंतर आज बीसीसीआयने मजुमदार यांच्यावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली. मजुमदार यांना आता भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय किंवा कोणत्याही क्रिकेट सामन्यांचे accreditation मिळणार नाही. त्याशिवाय बीसीसीआयशी नोंदणीकृत क्रिकेटपटूंची मुलाखतही त्यांना घेता येणार नाही.


हेही वाचा – पृथ्वी शॉचं मुंबईतील अलिशान घर पाहिलत का? किंमत वाचून व्हाल थक्क

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -