घरक्रीडाBCCI ने कॅप्टन कूलला दिले 'Tribute', चाहते झाले खूश

BCCI ने कॅप्टन कूलला दिले ‘Tribute’, चाहते झाले खूश

Subscribe

आयपीएल (IPL)नंतर भारतीय संघ पहिली सीरिज खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. २७ नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पहिला वनडे सामना खेळला जाईल. कोरोना काळात भारतीय संघ पहिला इंटरनॅशनल सीरिज खेळणार आहे. तसेच धोनीच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट संघ पहिल्यांदा इंटरनॅशनल सीरिज खेळेलं. दरम्यान बीसीसीआयने कॅप्टन कुल माहीला एका अनोख्या पद्धतीने ट्रिब्युट दिलं आहे.

बीसीसीआयने जेव्हा ऑस्ट्रेलिया विरुद्धातील सामना खळण्यासाठी भारतीय संघ जाहीर केला तेव्हा लगेच यानंतर ट्विटर कव्हर फोटो बदलून धोनीच्या नावे केलं. बीसीसीआयने ट्विटरवर फोटो शेअर करून लिहिलं की, धन्यवाद एमएस धोनी. बीसीसीआयने हॅशटॅश टॅग #ThankYouMSDhoni लिहून धोनीला सलाम केला.

- Advertisement -

बीसीसीआयने धोनीला दिलेल्या या ट्रिब्युटच्या स्टाईलचे कौतुक केलं जात आहे. तसेच यामुळे धोनीचे चाहते देखील खुश झाले आहेत. १५ ऑगस्टला धोनीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून निवृत्त होत असल्याचे जाहीर केलं होत. ज्यानंतर क्रिकेटप्रेमी खूप नाराज झाले होते. यावेळेस आयपीएल २०२०मध्ये धोनीची टीम सीएसके (CSK)चा परफॉर्मंस चांगला नव्हता. आता सीएसके प्लेऑफमधून बाहेर झाली आहे. दरम्यान पहिला भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध डे-नाईट टेस्ट मॅच खेळणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IND vs AUS : सूर्यकुमारला संधी न मिळण्यामागचे कारण सौरव गांगुलीने शोधावे – वेंगसरकर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -