घरक्रीडा...म्हणून केला बीसीसीआयने धोनीचा फोटो पोस्ट

…म्हणून केला बीसीसीआयने धोनीचा फोटो पोस्ट

Subscribe

बीसीसीआयने धोनीचा फोटो शेअर केला आहे.

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची कारकिर्द संपुष्टात आल्याची चर्चा रंगू लागली आहे. यातच आता बीसीसीआये ट्विटरवर धोनीचा फोटो शेअर केला आहे. धोनीचा आज ना वाढदिवस आहे, ना आजच्या दिवशी त्याच्या नावावर कोणता विक्रम आहे. त्यामुळे धोनीचा फोटो बीसीसीआयने पोस्ट का केला अशा चर्चा सुरु आहेत.

भारतावर करोनाचे संकट ओढावले आहे. करोनाच्या भीतीने अनेक लोक घाबरुन गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने धोनीचा हसरा फोटो पोस्ट करत त्याला आनंदी राहण्यासाठी हसणे महत्वाचे आहे, असे कॅप्शन दिले आहे.

- Advertisement -

भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी धानीला आयपीएल स्पर्धेत चमकदार कामगिरी करावी लागेल, अशी अटच घालण्यात आली आहे. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. जर आयपीएल झालीच नाही तर धोनीची आंतरराष्ट्रीय कारकिर्द संपुष्टात येईल, अशी चर्चा आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -