घरक्रीडाBCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचं समोर आलं आहे. पश्चिम बंगालमधील कोलकाताच्या वूडलँड हॉस्पिटलमध्ये सौरव गांगुली यांना दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी सौरव गांगुली यांची तब्येत बिघडली होती. माहितीनुसार, सौरव गांगुली जिममध्ये वर्कआउट करत होते. ही जिम त्यांच्या घरीच आहे. जिममध्ये असताना त्यांच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर त्यांना त्वरित वूडलँड हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलं. त्यामुळे आज सायंकाळी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी (Angioplasty) होणार आहे. काही दिवसांपूर्वी सौरव गांगुली यांनी सोशल मीडियावर मुलीसोबतचा एका जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला होता.

- Advertisement -

 

‘सौरव गांगुली लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करतो. माझं त्यांच्या कुटुंबासोबत बोलणं झालं आहे. सध्या दादाची प्रकृती स्थिर असून उपचारांना ते चांगला प्रतिसाद देत आहेत,’ असं ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांनी केलं आहे.  (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

- Advertisement -

 

तसेच या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘सौरव गांगुली यांनी सौम्य कार्डिक हृदयविकाराच्या झटक्याचा सामना करावा लागत आहे, हे ऐकूण खूप दुःख झालं. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. लवकर बरे व्हावे अशी कामना. माझ्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबासमवेत आहेत.’


हेही वाचा – ऑस्ट्रेलियन्स मला गेट लॉस्ट म्हणाले होते, गावस्करांचा मेलबर्न कसोटीच्या वॉक आऊटवर खुलासा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -