Sourav Ganguly : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींना कोरोनाची लागण, तिसऱ्यांदा रुग्णालयात दाखल

BCCI President Sourav Ganguly admitted to hospital

भारत क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलींना कोरोनाची लागण झाली आहे. गांगुली यांना कोलकाता मधील वुडलॅंड या रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांनी विलगीकरणं केलं आहे. देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. ४९ वर्षीय गांगुलींनी व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतले आहेत. तरीसुद्धा त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.

सतत कामाच्या तणावात असणाऱ्या गांगुलींना सोमवारी रात्री तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली होती. लागण झाल्यानंतर त्यांना वुडलॅंड्सच्या नर्सिंग होममध्ये आणण्यात आल्याची माहिती बोर्डकडून देण्यात आली आहे. सौरव गांगुली यांचे मोठे भाऊ स्नेहाशीष गांगुलींना सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समजलं जात आहे.

जानेवारी २०२१ मध्ये गांगुलींवर अँजियोप्लास्टी

सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल वेल सून असं सांगितलं जात आहे. यंदाचं वर्ष गांगुली यांच्यासाठी इतकं खास नव्हतं. कारण त्यांना तिसऱ्यांदा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जानेवारी २०२१ मध्ये हृदयाच्या त्रासामुळे गांगुलींवर अँजियोप्लास्टी करण्यात आली होती. रूग्णालयात काही दिवस आराम केल्यानंतर त्यांना घरी डिस्चार्ज देण्यात आला. अलीकडेच भारताचा कर्णधार विराट कोहली याच्याशी त्यांचे वादंग सुरू होते. तसेच या वादाचे पडसाद संपूर्ण देशभरात आणि क्रिकेट क्षेत्रात उमटले होते.

देशातील कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ

देशात आज (मंगळवार) कोरोनाचे ६ हजार ३५८ इतक्या नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत ६ हजार ४५० रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर देशभरात कोरोनाचे ७५ हजारांहून अधिक रूग्ण सक्रिय आहेत. त्याचप्रमाणे रूग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट ९८.४० टक्के इतका आहे.


हेही वाचा : Maharashtra Assembly Winter Session 2021 : १२ आमदारांचं निलंबन हे सूडबुद्धी नाहीतर काय?, चंद्रकांत पाटलांचा सवाल