T-20 World Cup: 1-2 पराभवाची मला चिंता नाही, परंतु…; सौरव गांगुलीचे भारतीय संघाबाबात मोठे वक्तव्य

मागील अनेक सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. नुकताच झालेल्या आशिया चषक 2022 मध्येही भारताचा पराभव झाला असून, सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला.

मागील अनेक सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) पराभवाचा सामना करावा लागला आहे. नुकताच झालेल्या आशिया चषक 2022 मध्येही भारताचा पराभव झाला असून, सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. त्यावरून माजी खेळाडूंपासून अनेक क्रिकेट विश्लेषक भारतीय संघाला सल्ले देत आहेत. शिवाय खेळाडूंची खेळी सुधारण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. अशातच भारताचा माजी कर्णधार बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यानीही आपले मत मांडले आहे. (BCCI president Sourav Ganguly India rohit sharma t20 world cup)

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सौरव गांगुली याने मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाला येत असलेल्या अपयशाबाबत चिंता व्यक्त केली. ”रोहित शर्माची विजयाची टक्केवारी ही जवळपास 80 टक्के इतकी आहे. भारताने 3-4 सामने गमावले आहेत. परंतु, त्याआधी रोहितच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या 35-40 सामन्यांपैकी केवळ 5-6 सामने गमावले आहेत. भारतीय संघाबाबत रोहित व राहुल द्रविड यांनाही तितकीच काळजी आहे, याची मला खात्री आहे. ते सुधारणार करतील. त्यामुळे 1-2 पराभवाची मला चिंता नाही, परंतु हो, हे तितकेच खरे की, आम्हाला मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. आम्ही त्यावर चर्चा करू”, असे सौरव गांगुलीने म्हटले.

दरम्यान, सध्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा (Team India) सराव सुरू आहे. तसेच, संघाच्या तयारीचा रिआलिटी चेकही सुरू आहे. गतवर्षी विराट कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी सोडल्यानंतर रोहितने मोर्चा हाती घेतली. द्विदेशीय मालिकांमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने यश मिळवले, परंतु आशिया चषक स्पर्धेत अपयशी ठरले. गांगुलीने रोहितचे नेतृत्व व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिला टी-20 सामना

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 4 गडी राखून भारतावर विजय मिळवला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 209 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगली सुरूवात केली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार व सलामीवीर अॅरॉन फिंचने सामन्याच्या सुरूवातीलाच फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. त्यामुळे संघाला 209 धावांचे आव्हान पार करणे सहज शक्य झाले.


हेही वाचा – IND vs AUS: दुसऱ्या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माचे गोलंदाजांना खास मार्गदर्शन