घरक्रीडाInd Vs pak 2021 : भारत-पाक सामन्यावर BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

Ind Vs pak 2021 : भारत-पाक सामन्यावर BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

Subscribe
आयसीसी टी ट्वेंटी विश्वकपाला सुरूवात झाली आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तान विरूध्द खेळणार आहे. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर संध्याकाळच्या सुमारास होणार आहे. या सामन्याच्या निकालाच्या निमित्ताने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी एक महत्वाचा खुलासा केला आहे. भारतीय संघाच्या सध्याच्या कामगिरीवरही सौरभ गांगुलीने टिप्पणी केली आहे.
शेवटच्या ८ वर्षांत भारतीय संघ आयसीसीचा एकही चषक जिंकलेला नाही ? यावर बोलताना त्यांनी सांगितले प्रत्येक वेळी भारतच जिंकेल असे नाही होऊ शकत. २०११ मध्ये भारताने विश्वकप जिंकला, २००७ मध्ये टी ट्वेंटी विश्वकप जिंकला. त्याआधी २००३ मध्ये भारताने विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली, त्यानंतर २०१४ मध्ये टी ट्वेंटी विश्वचषकाची फाइनल मॅच खेळली. तर  २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॅाफीच्या अंतिम फेरीत पाकिस्तानकडून भारतीय संघाचा पराभव झाला. भारताने २०१९ मध्ये विश्वकपातील उपांत्य फेरी गाठली. आता प्रत्येक वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप असते. असे सामने याआधी होत नव्हते. त्यामुळे सामन्यांचे वेगवेगळे निकाल येऊ शकतात. अशा शब्दांत एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना गांगुली यांनी आपले मत मांडले.
गांगुली यांनी सांगितले भारतीय संघ एवढा मजबूत आहे, खेळाडू इतकी चांगली कामगिरी करत आहेत की, फायनल खेळण्याची संधी येतच राहील. यंदाच्या वर्षातील विश्वचषक दुबईमध्ये आहे, तो भारतातच होणार होता, पण कोविडच्या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये खेळविण्यात येत आहे. चालू विश्वकपात भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
” मोठे सामन्यांमध्ये संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्यामुळे मी आशा करतो की, पुन्हा एकदा भारतीय संघ टी ट्वेंटी विश्वचषक जिंकेल. माझा भारतीय खेळाडूंवर दबाव नाही, दबावात न खेळता मोठे शॉर्ट्स मारून खेळा कारण हा फॉरमॅचट मोकळेपणाने खेळण्याचा आहे ” अशा शब्दांत गांगुलीनी भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढवले.
पाकिस्तानसोबत भारताचा इतिहास चांगला आहे. पाकिस्तानचा संघ पण चांगला आहे. पण तणावातील सामना भारत नेहमीच जिंकत आला आहे. म्हणूनच हा सामना खूप निर्णायक ठरतो. पण २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॅाफीमध्ये पाकिस्तानने भारताचा फायनलमध्ये पराभव केला होता. त्यामुळे आता सावधानतेने खेळणे महत्त्वाचे असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -