Rahul Dravid head Coach Tenure: विश्वचषक 2023 मध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. परंतु याचवेळी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ देखील संपला आहे. रवी शास्त्री यांच्यानंतर द्रविडने रोहित शर्मासह भारतीय संघाची धुरा सांभाळली. द्रविडच्या कार्यकाळात, भारताने एक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स फायनल, एक T20 वर्ल्ड कप आणि एक वनडे वर्ल्डकप खेळला, परंतु तो देखील ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवू शकला नाही. भारताला आता 23 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची T-20 मालिका खेळायची आहे आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौराही करायचा आहे. राहुल द्रविडसोबत केलेला करार रिन्यू केला जाणार की टीम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळणार याबाबत बीसीसीआय लवकरच घोषणा करणार आहे. (BCCI Rahul Dravid s journey with Indian team is also over Big announcement coming soon)
विश्वचषक फायनलनंतर द्रविडने टीम इंडियासोबतच्या भविष्याबद्दल सांगितले, ‘मी याबद्दल विचार केलेला नाही. मी नुकताच सामना संपवला आहे. मला याचा विचार करायला वेळ नाही. होय, मला वेळ मिळेल तेव्हा ते करेन, पण सध्या माझे संपूर्ण लक्ष या मोहिमेवर होते. माझे लक्ष या विश्वचषकावर होते आणि माझ्या मनात दुसरे काही नव्हते आणि भविष्यात काय होईल याचा मी अजून विचार केलेला नाही.
राहुल द्रविडने ज्युनियर क्रिकेटमध्ये प्रशिक्षक म्हणून खूप यश मिळवले होते, पण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर तो भारतासाठी एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकला नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, भारताने 2016 अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये उपविजेतेपद पटकावले आणि 2018 अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला.
याशिवाय, ऋषभ पंत, इशान किशन, श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदर यासारख्या भारतीय स्टार्सना तयार करण्याचे श्रेयही त्याला जाते.
चार वर्षे कनिष्ठ संघांना प्रशिक्षण दिल्यानंतर, द्रविडची जुलै 2019 मध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये क्रिकेट प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
वर्ल्ड कप फायनलपर्यंतचा भारताचा प्रवास कसा होता?
8 ऑक्टोबर रोजी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवून विश्वचषक 2023 च्या मोहिमेची सुरुवात केली. यानंतर संघाने लक्ष्याचा पाठलाग करत अफगाणिस्तान, कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध विजयाची नोंद केली. संघ एका दिशेने धावतोय असे वाटत असताना भारताने जगाला दाखवून दिले की लक्ष्य कसे ठरवायचे आणि त्याचा बचाव कसा करायचा हे त्यांना माहीत आहे. त्यानंतर भारताने ग्रुप स्टेजचे सर्व 9 सामने इंग्लंडला 100 धावांनी, श्रीलंकेला 302 धावांनी, दक्षिण आफ्रिकेला 243 धावांनी आणि नेदरलँड्सला 160 धावांनी पराभूत केले.
उपांत्य फेरीत भारतासमोर न्यूझीलंडचे कडवे आव्हान होते, मात्र या सामन्यातही टीम इंडियाने किवी संघाला 397 धावांची मोठी धावसंख्या उभारून बॅकफूटवर आणले आणि हा सामना 70 धावांनी जिंकला. संपूर्ण विश्वचषकात भारताने चमकदार कामगिरी केली, पण अंतिम दिवस टीम इंडियाच्या नावावर नव्हता.
(हेही वाचा: सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली असे केले का? कपिल देव प्रकरणावरून संजय राऊतांचे शरसंधान )