घरक्रीडाआधी पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवण्याची हमी द्यावी, मग व्हिसा मागावा!

आधी पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवण्याची हमी द्यावी, मग व्हिसा मागावा!

Subscribe

पीसीबीच्या मागणीला बीसीसीआयचे प्रत्युत्तर

भारत आणि पाकिस्तान या देशांतील वाद काही नवे नाहीत. राजकीय तणावांमुळे या दोन देशांमध्ये क्रिकेटचे सामनेही होत नाहीत. यंदा आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती. परंतु, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपला संघ पाकिस्तानमध्ये पाठवण्यास नकार दिला. त्यामुळे ही स्पर्धा यंदा युएई किंवा श्रीलंकेत होऊ शकेल. २०२१ टी-२० आणि २०२३ एकदिवसीय विश्वचषक हे भारतात होणार आहे.

पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध लक्षात घेता पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळण्यास अडचण येऊ शकेल असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) मुख्य कार्यकारी अधिकारी वसिम खान यांना वाटते. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंना भारतात जाण्यासाठी व्हिसा मिळेल याची बीसीसीआयने लेखी हमी द्यावी अशी आयसीसीकडे मागणी केली आहे. परंतु, ही गोष्ट बीसीसीआयला फारशी आवडलेली नाही.

- Advertisement -

आधी पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवण्याची हमी द्यावी, मग व्हिसा मागावा, असे बीसीसीआयचा एक अधिकारी म्हणाला. खेळात कोणताही राजकीय हस्तक्षेप असू नये, असे आयसीसीचे नियम सांगतात. हेच क्रिकेट संघटनांनाही लागू पडते. त्यांनी सरकारच्या कामात हस्तक्षेप करणे योग्य नाही. पाकिस्तान दहशतवादी कारवाया

थांबवेल आणि पुलवामासारखी घटना पुन्हा होणार नाही, याची पीसीबी लेखी हमी देऊ शकते का? पीसीबीने जरा समजून काम केले पाहिजे. आयसीसीमध्ये कायम भारताच्या विरोधात बोलण्याची गरज नाही. भारत हा खूप चांगला देश असून कोणतेही काम पूर्ण विचार करुनच करतो, असेही बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -