नवी दिल्ली: Viacom 18 ने टीम इंडियाच्या घरच्या सामन्यांचे प्रसारण हक्क खरेदी केले आहेत. Viacom 18 ने टीव्हीसह डिजिटल मीडिया राईट्स खरेदी करण्यात यश मिळवलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या होम सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क मिळवण्यासाठी BCCI ने ई-लिलाव प्रक्रिया आयोजित केली होती. यामध्ये Viacom 19 ने टीम इंडियाच्या होम सामन्यांचे टीव्ही आणि डिजिटल प्रसारण हक्क विकत घेतले आहेत. यासह, आता हा करार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेपासून सूरू होईल. (BCCI s media rights to Mukesh Ambani Matches that can be seen on Viacom18)
डिज्ने प्लस हॉटस्टारदेखील BCCI चे मीडिया राईट्स मिळवण्याच्या शर्यतीत होती, पण त्यांना यश मिळू शकले नाही. यापूर्वी, टीम इंडियाच्या होम सामन्यांच्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्टस नेटवर्ककडे होते. ते गेल्या 11 वर्षांपासून त्यांच्याकडे होते.
BCCI आणि Viacom18 यांच्यात पाच वर्षांसाठी मीडिया हक्कांबाबत करार झाला आहे. पुढील पाच वर्षांत भारतीय संघ घरच्या मैदानावर 88 सामने खेळणार आहे. यामध्ये 25 कसोटी, 27 वन डे आणि 36 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. मीडिया हक्कांसाठी टेलिव्हिजची मूळ किंमत 20 कोटी रुपये होती, तर डिजिटल अधिकारांची मूळ किंमत 25 कोटी रुपये होती. त्यामुळे दोन्ही माध्यमांची एकूण मूळ किंमत 45 कोटी रुपये होती. ज्यामध्ये वायकॉम 18 ने स्टार स्पोर्टस, सोनी नेटवर्क यांना मागे सोडून मीडिया हक्क मिळवले आहेत, असे मानले जाते की BCCI ला दोन्ही मीडिया हक्कांसाठी 5 हजार 280 कोटी रुपये हवे होते. ज्यातून त्यांना प्रती सामन्यासाठी 60 कोटी मिळतील.
Cricbuzz ने दिलेल्या माहितीनुसार, BCCI ला आता प्रती सामना 67.8 कोटी असे पाच वर्षांत 5,966,4 कोटींची डील मिळाली आहे. 2018-2023 या कालावधीत स्टार इंडियाने 6130.10 कोटी रुपयांत मीडिया हक्क जिंकले होते. त्यापेक्षा आताची रक्कम कमी वाटत असली तरी तेव्हा 100+ सामने होते आणि आता 88 सामने आहेत. त्यानुसार, पुढील पाच वर्षांत BCCI ला प्रतीसामना 67.7 कोटी मिळतील. डिजिटल हक्क 3100 कोटींना आणि टेलिव्हिजनचे हक्क 2860 कोटींना विकले गेले आहेत.
(हेही वाचा: रंगारंग कार्यक्रमाने आशिया कपला सुरुवात; पहिली लढत पाक विरुद्ध नेपाळ )