घरक्रीडामाजी खेळाडूंसाठी बीसीसीआयची मोठी घोषणा; 'इतक्या' जणांच्या पेन्शनमध्ये वाढ

माजी खेळाडूंसाठी बीसीसीआयची मोठी घोषणा; ‘इतक्या’ जणांच्या पेन्शनमध्ये वाढ

Subscribe

माजी भारतीय क्रिकेट (Former Cricketer) खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. बीसीसीआय (BCCI) सचिव जय शाहा (Jay Shah) यांनी केलेल्या घोषणेमुळे माजी खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी खेळाडींच्या पेन्शनची (Pention) रक्कम वाढवण्याच्या दिशेने बीसीसीआयने एक पाऊल पुढे उचलले आहे.

माजी भारतीय क्रिकेट (Former Cricketer) खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. बीसीसीआय (BCCI) सचिव जय शाहा (Jay Shah) यांनी केलेल्या घोषणेमुळे माजी खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी खेळाडींच्या पेन्शनची (Pension) रक्कम वाढवण्याच्या दिशेने बीसीसीआयने एक पाऊल पुढे उचलले आहे. बीसीसीआयने आपल्या पेन्शनमध्ये केलेल्या बरघोस वाढीमुळे काही जणांना तर थेट दुप्पट पेन्शन मिळणार आहे. त्यामुळे एकिकडे दमदार कमाई होत असताना बीसीसीआय माजी खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना विसरलेली नाही, हे पाहायला मिळत आहे. (Bcci Secretary Jai Shah Big Announcement for former cricketer about pension)

हेही वाचा – Women’s T20 Challenge: ‘या’ मैदानात होणार महिला टी-20 चॅलेंज स्पर्धा, बीसीसीआय सचिव जय शाहांची घोषणा

- Advertisement -

याबाबत बीसीसीआय सचिव जय शाहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “क्रिकेटपटूंचे हित जपणारी बीसीसीआय ही एक संस्था आहे. खेळाडूंचे कल्याणाबाबत नेहमीच विविध सुविधा करत असतो. मग हे खेळाडू आजी असो किंवा माजी. माजी खेळाडूंचे भारतीय क्रिकेटला भरूव योगदान आहे आणि त्यांच्या भक्कम पायामुळेच हा क्रिकेटचा डोलारा उभा आहे. त्यामुळे माजी खेळाडींच्या पेन्शनची रक्कम वाढवण्याच्या दिशेने बीसीसीआयने एक पाऊल पुढे उचलले आहे”, असे त्यांनी म्हटले.

हेही वाचा – श्रीलंकेला हवंय आशिया चषक २०२२ चे यजमानपद, पण निर्णय बीसीसीआय सचिव जय शाहांच्या हाती

- Advertisement -

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फायदा

“माजी खेळाडूंबरोबर बीसीसीआयच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे, यामध्ये पंचांचाही समावेश करण्यात येत आहे. भारतीय क्रिकेटसाठी त्यांच्या मेहनती सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे. एकूण ९०० कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच, ७५ टक्के पेक्षा जास्त लाभार्थ्यांना १०० टक्के वाढ मिळणार आहे.”, असेही जय शाहा यांनी म्हटले.


हेही वाचा – क्रिकेट खेळायला गेला अन् काळाने केला घात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -