यूएईनंतर IPL 2022चा थरार कुठे रंगणार?, बीसीसीआय सचिव जय शाह यांची मोठी घोषणा

आयपीएलच्या पुढील पर्वात १० संघ मैदानात उतरवणार...

bcci secretary jay shah

आयपीएल २०२१चं दुसरं सत्र संपल्यानंतर आता आयपीएल २०२२ चा थरार कुठे रंगणार, याबाबत बीसीसीआय सचिव जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. आयपीएलच्या पुढील पर्वात १० संघ मैदानात उतरवणार असल्याचं सांगितलं जात आहे. युएईमध्ये आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा यूएईत पार पडल्यानंतर आता आयपीएल २०२२ कुठे खेळवली जाणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. याबाबत जय शाह यांनी महत्त्वाची घोषणा केलीय.

चेन्नईमध्ये इंडिया सिमेंटच्या ७५ व्या वर्षपूर्ती निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात चेन्नई सुपर किंग्जच्या आयपीएल २०२१च्या जेतेपदाचा आनंद साजरा करण्यात आला. तसेच चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंचा गौरव देखील करण्यात आला. परंतु यावेळी आयपीएल २०२२ भारतातच होणार असल्याचे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी जाहीर केले आहे.

२०११ मध्ये १० संघ खेळवण्यात आले होते. त्यानंतर आता २०२२ मध्येही १० संघ खेळवण्यात येणार आहेत. तसेच याची दोन गटांत देखील विभागणी केली जाईल. साखळी फेरीत प्रत्येक संघ १४ सामने खेळवले जातील. तसेच विजयी संघाला दोन गुण मिळतील. तर अनिर्णीत राहिल्या दोन्ही संघाला प्रत्येकी १ गुण देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आयपीएल २०२१चं दुसरं सत्र संपल्यानंतर आयपीएल २०२२ च्या तयारीला सुरूवात देखील झाली आहे. २७ मार्चपासून आयपीएल २०२२ सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु २०२२ मध्ये दोन नवीन संघाची घोषणा करण्यात येणार आहे. दोन्ही संघ लखनऊ आणि अहमदाबादचे असणार आहेत. आता आठ संघ आयपीएल खेळत आहेत. परंतु आता अजून दोन संघ आयपीएल २०२२ मध्ये खेळणार असून एकूण संघाची संख्या १० होणार आहे.