घरक्रीडाआयपीएलमध्ये आता पॉवर प्लेयर?

आयपीएलमध्ये आता पॉवर प्लेयर?

Subscribe

बीसीसीआय नवी संकल्पना राबवण्याच्या विचारात

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा सुरु करत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टी-२० क्रिकेटचे रूप बदलले. ही स्पर्धा जगातील सर्वोत्तम टी-२० स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आता लवकरच बीसीसीआय या स्पर्धेत नवा नियम आणण्याच्या विचारात आहे. आयपीएलच्या पुढील मोसमात बीसीसीआय पॉवर प्लेयर ही संकल्पना राबवण्याचा विचार करत आहे. या नियमामुळे, संघांना खेळाडू बाद झाल्यावर किंवा कोणतेही षटक संपल्यावर अंतिम ११ मध्ये नसलेल्या एका राखीव खेळाडूला संधी देता येणार आहे.

पॉवर प्लेयर हा नवीन नियम लागू करण्यास मंजुरी मिळाली आहे. मात्र त्यावर मंगळवारी मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात होणार्‍या आयपीएल प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत विस्तृतपणे चर्चा करण्यात येणार आहे, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले, प्रत्येक सामन्यात संघांना अंतिम ११ ऐवजी १५ खेळाडूंची निवड करता येईल. संघांना विकेट गेल्यावर किंवा कोणतेही षटक संपल्यावर एका राखीव खेळाडूला संधी देता येईल. आयपीएलमध्ये हा नियम लागू करण्याचा आमचा विचार आहे, पण त्याआधी आगामी सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत हा नियम लागू करणे योग्य ठरेल.

- Advertisement -

या नियमामुळे संघांना अनोख्या योजना आखता येतील आणि त्यामुळे चाहते या स्पर्धेत अधिकच रस घेतली, असे बीसीसीआयच्या अधिकार्‍याला वाटते. याबाबत त्यांनी सांगितले, समजा एखाद्या संघाला अखेरच्या ६ चेंडूत २० धावांची गरज आहे आणि आंद्रे रसेलसारखा खेळाडू पूर्णपणे फिट नसल्याने अंतिम ११ चा भाग नाही. मात्र, तो हे सहा चेंडू खेळून आपल्या संघाला सामना जिंकवून देऊ शकेल. तसेच, अखेरच्या षटकात संघाला सहा धावा वाचवायच्या असतील आणि जसप्रीत बुमराह अंतिम ११ मध्ये नसेल, तर १९ वे षटक संपल्यानंतर कर्णधार बुमराहला मैदानात उतरवू शकेल. या नव्या नियमात सामन्याचा निकाल बदलण्याची ताकद आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -