WPL 2023: महिला आयपीएलसाठी संघाची घोषणा, अदानीचा अहमदाबाद संघावर ताबा

बीसीसीआयने महिला आयपीएलची घोषणा केली आहे. 25 जानेवारी रोजी लीगच्या नवीन पाच फ्रँचायझींची घोषणा करण्यात आली आहे. महिला आयपीएलच्या पाच संघांमध्ये अहमदाबादसाठी सर्वाधिक यशस्वी बोली लावली गेली. अदानी स्पोर्ट्सलाइन कंपनीने 1 हजार 289 कोटी रुपयांना अहमदाबादची फ्रेंचायझी विकत घेतली. तर पुरुषांच्या आयपीएलच्या 7 फ्रँचायझींपैकी फक्त मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांना यात फ्रँचायझी मिळाल्या आहेत.

हे आहेत महिला आयपीएल संघ 2023 –

अहमदाबाद महिला आयपीएल संघ
मुंबई महिला आयपीएल संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला आयपीएल संघ
दिल्ली महिला आयपीएल संघ
लखनऊ महिला आयपीएल संघ

या लिलावात 10 पैकी 7 आयपीएल फ्रँचायझींनी भाग घेतला होता. परंतु चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे तीन संघ या लिलावात सहभागी झाले नाहीत. महिला प्रीमियर लीगचे संघ विकत घेण्यात पाच कंपन्यांना यश आले आहे. अदानी स्पोर्ट्स लाइन प्रायव्हेट लिमिटेडने अहमदाबादला 1289 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तर इंडिया विन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने मुंबईला 912.99 कोटींना विकत घेतले आहे. महिला आयपीएलचा तिसरा संघ बंगळुरू आहे.

रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड बेंगळुरूने 901 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. दिल्लीला जेएसडब्ल्यू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेडने 810 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तसेच कॅप्री ग्लोबल होल्डिंग्सने लखनौचा महिला संघ विकत घेतला आहे. त्यांनी 757 कोटी रुपये खर्च केले आहेत. बीसीसीआयला सर्व ५ आयपीएल संघांसाठी 4669.99 कोटी रुपये मिळाले आहेत.


हेही वाचा : IND vs NZ 3rd ODI: वनडे मालिकेत भारताचा न्यूझीलंडला क्लीन स्वीप