घरक्रीडा...म्हणून BCCI ने रद्द केली सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा

…म्हणून BCCI ने रद्द केली सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा

Subscribe

जाणून घ्या काय आहे कारण

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात BCCI चे सचिव जय शहा यांनी भारतीय क्रिकेटपटू घडवणारी सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती सर्व राज्य संघटनांना पत्राद्वारे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी कळवली आहे. दरम्यान, सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने घेतला असून यासह रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रुपात दररोज ४५ हजार रुपये कमावणाऱ्या खेळाडूंना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय देखील BCCI ने घेतला आहे.

…म्हणून रद्द केली मोठी रणजी ट्रॉफी स्पर्धा

भारतीय क्रिकेटपटू घडवणारी सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा घेण्यासाठी BCCI कडे पुरेसा वेळ नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर दोन महिन्यांच्या बायो बबलमुळे रणजी करंडक स्पर्धा खेळवणे कोरोनाच्या सद्यस्थितीत अवघड आहे. त्यामुळे मर्यादित षटकांचे अधिक सामने खेळवण्याचा BCCI चा प्रयत्न आहे. या स्पर्धांमधून प्रत्येक खेळाडूला प्रती सामना किमान १.५ लाख रुपये मिळतात. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मार्च महिन्याच्या शेवटी सुरु होण्याची शक्यता असल्याने या स्पर्धेतील खेळाडूंना आयपीएलसाठी हजर राहवं लागणार आहे.

- Advertisement -

दरम्यान रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमधील कोणती स्पर्धा खेळवायची याबाबत BCCI मध्ये संभ्रम असल्याने BCCI ने सर्व राज्य संघटनांना पत्र लिहून त्यांचे मत विचारले. त्यावेळी बहुतेक संघटनांनी विजय हजारे ट्रॉफी खेळवण्यास पसंती दिली. असे असताना BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली मात्र रणजी ट्रॉफी खेळवण्याच्या बाजूने होते. ”विजय हजारे ट्रॉफीसह वरिष्ठ महिला वन डे स्पर्धेचे आयोजन करणार असल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. याशिवाय १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धाही आयोजित केली जाणार आहे. २०२०-२१च्या हंगामात या स्थानिक स्पर्धा खेळवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,”असे शाह यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by FirstSportz Cricket (@fscricket)

- Advertisement -

सध्या सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धा सुरू असून ही झाल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी ही स्पर्धा घेण्याचा निर्णय BCCI कडून घेण्यात आला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत चार दिवसांच्या लढती असतात. विजय हजारे ट्रॉफीमध्ये एक दिवसांच्या लढती असतात. तर मुश्ताक अली स्पर्धेच्या धर्तीवर देशातील सहा मुख्य शहरांमध्ये विजय हजारे स्पर्धा देखील खेळवली जाणार आहे. पुढच्या आठवड्यात या स्पर्धेचं वेळापत्रक अंतिम करण्यात येईल. त्यानंतर खेळाडू बायो-बबलमध्ये प्रवेश करणार असल्याचेही सांगितले जात आहे. एक महिना चालणाऱ्या या स्पर्धेत विजय हजारेसह महिलांच्या वरीष्ठ गटातील वन-डे स्पर्धा खेळवण्याचा निर्णय देखील BCCI ने घेतला आहे.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -