Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा आयपीएलनंतर होणार WTCचा अंतिम सामना, बीसीसीआयने दिली आयपीएलच्या संघांना तंबी

आयपीएलनंतर होणार WTCचा अंतिम सामना, बीसीसीआयने दिली आयपीएलच्या संघांना तंबी

Subscribe

आयपीएलच्या १६व्या हंगामाला येत्या ३१ मार्चपासून सुरूवात होणार आहे. परंतु भारतीय क्रिकेट संघ सध्या आपल्या खेळाडूंच्या दुखापतींमुळे हैराण झाला आहे. टीम इंडियाचे अनेक खेळाडू दुखापतींशी झुंज देत आहेत. त्यामुळे ते आयपीएल २०२३ च्या यंदाच्या हंगामात सहभागी होऊ शकणार नाहीत. मात्र, याच वर्षातील ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात एकदिवसीय विश्वचषक भारतात आयोजित केला जाणार आहे. तसेच आयपीएलनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना देखील खेळला जाणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने सावधगिरीची भूमिका घेत आयपीएलच्या सर्व संघांना तंबी दिली आहे.

बीसीसीआयने आयपीएल फ्रँचायझींना त्यांच्या गोलंदाजांबाबत कडक सूचना दिल्या आहेत. करारबद्ध खेळाडूंबाबत बीसीसीआयने निर्देश दिले आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने सर्व आयपीएल फ्रँचायझींना सूचना दिली आहे की, बोर्डाच्या करारबद्ध खेळाडूंवर जास्त भार टाकू नये. कारण त्यांना थकवा येण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. बीसीसीआयने विशेषत: गोलंदाजांच्या बाबतीत सावध राहण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय क्रिकेट अकादमी फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल, भारतीय संघाचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक सोहम देसाई यांनी सर्व फ्रँचायझींना झूमच्या बैठकीत हा संदेश आणि सूचना दिल्या. बीसीसीआयाला यावर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी निवडलेल्या २० गोलंदाजांची चिंता आहे. या २० गोलंदाजांपैकी एकही खेळाडू जखमी होणार नाही, अशी बीसीसीआयला आशा आहे.

कोणत्या खेळाडूंवर बीसीसीआयची नजर?

- Advertisement -

मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, दीपक चहर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक आणि वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंवर विशेषत: बीसीसीआय लक्ष ठेवून आहे. आयपीएलच्या हंगामाला ३१ मार्चपासून सुरूवात होणार असून अंतिम सामना २८ मे रोजी होणार आहे.


हेही वाचा : बॉक्सिंगमध्ये निखतकडून देशाला सुवर्णपदक, आनंद महिंद्रांनी दिली थार गिफ्ट


 

- Advertisment -