घरक्रीडाआयपीएलमधील सामन्यांची संख्या बीसीसीआय वाढवणार, 2027 पर्यंत हंगामात ९४ सामने असणार

आयपीएलमधील सामन्यांची संख्या बीसीसीआय वाढवणार, 2027 पर्यंत हंगामात ९४ सामने असणार

Subscribe

स्पर्धा लांबलचक झाल्यास त्याचा परिणाम प्रेक्षकांवर होत असल्याचे दिसत आहे. यंदाच्या हंगामात ७४ सामने केल्यामुळे नंतर प्रेक्षकांची संख्या कमी झाली होती. अशा परिस्थितीमध्ये जर सामन्यांची संख्या आणखी वाढवली तर त्याचा परिणाम प्रेक्षकांच्या संख्येवर होऊ शकतो.

आयपीएलच्या आगामी हंगामात सामन्यांची संख्या वाढवण्याची शक्यता आहे. बीसीसीआयकडून 2027 पर्यंतच्या आयपीएल हंगामात ९४ सामने खेळवण्यात येतील असे संकेत देण्यात आले आहेत. आयपीएल 2022 मध्ये एकूण ७४ सामने खेळवण्यात आले आहेत. आतापर्यंतच्या आयपीएल हंगामात ही सर्वात मोठी संख्या आहे. यापूर्वी 2021 मध्ये एकूण 60 सामने खेळवण्यात आले आहेत. तर 2023-2027 पर्यंत 410 सामने खेळवले जाऊ शकतात. बीसीसीआय प्रत्येक दोन हंगामानंतर आयपीएलच्या सामन्यांमध्ये वाढ करण्याच्या विचारात आहे.

आयपीएलच्या 2023 आणि 2024 च्या हंगामात 74 सामने खेळवण्यात येणार आहेत. यंदाच्या हंगामात ७४ सामने खेळवण्यात आले आहेत. येणाऱ्या हंगामात सामन्यांची संख्या 94 होईल. तसेच बीसीसीआय एका हंगामात सामन्यांची संख्या 84 ठेवण्यावरसुद्धा विचार करत आहे. कारण जास्त सामने असतील तर हंगाम लांबला जाईल.

- Advertisement -

आयपीएलमध्ये मिडीया अधिकार खरेदी करण्यास इच्छुक असणाऱ्या कंपन्यांना बीसीसीआयने सामन्यांमध्ये वाढ करणार असल्याची माहिती दिली आहे. 2023 ते 2027 पर्यंत 410 सामने अधिक खेळवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आगामी हंगामात आयपीएलच्या सामन्यांची संख्या 370 असणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र संपूर्ण हंगाम 84 सामन्यांमध्ये संपेल की, 94 सामन्यांमध्ये संपेल हे बीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले नाही. 94 सामन्यांच्या स्पर्धेमध्ये सर्व टीम आपापसात दोन सामने खेळतील आणि प्लेऑफमध्ये 4 सामने खेळतील. परंतु आयपीएलमध्ये 84 सामन्यांचे स्वरुप समजणे कठीण आहे.

काय परिणाम होईल?

सामन्यांच्या संख्येमध्ये वाढ केल्यास मीडिया अधिकार खरेदी करणाऱ्या कंपन्यांच्या लिलावामध्ये वाढ होईल. तसेच अधिक सामने असल्यामुळे माध्यमांवर सर्वाधिक जाहिराती उपलब्ध होतील. यामुळे कमाईसुद्धा वाढेल. यामुळे सर्व कंपन्या आयपीएलचे मीडिया अधिकार खरेदी करण्यासाठी अधिक बोली लावतील. याचा फायदासुद्धा बीसीसीआयला मोठ्या प्रमाणात होईल. परंतु सामन्यांची संख्या जास्त असल्यामुळे प्रेक्षकांमधील उस्तुकता कमी होण्याची शक्यता आहे. स्पर्धा लांबलचक झाल्यास त्याचा परिणाम प्रेक्षकांवर होत असल्याचे दिसत आहे. यंदाच्या हंगामात ७४ सामने केल्यामुळे नंतर प्रेक्षकांची संख्या कमी झाली होती. अशा परिस्थितीमध्ये जर सामन्यांची संख्या आणखी वाढवली तर त्याचा परिणाम प्रेक्षकांच्या संख्येवर होऊ शकतो.

- Advertisement -

हेही वाचा : भाजपला अतिरिक्त उमेदवार देऊन गोंधळ निर्माण करायचाय, संजय राऊतांची टीका

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -