घरक्रीडाखेळपट्टीने आम्हाला फरक पडत नाही- शास्त्री

खेळपट्टीने आम्हाला फरक पडत नाही- शास्त्री

Subscribe

भारताने रांची येथे झालेल्या तिसर्‍या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत तीन सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली. भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वात आणि प्रशिक्षक रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनात मागील काही काळात अप्रतिम कामगिरी केली आहे. भारताला घरच्या मैदानासोबतच परदेशातही सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात यश आले आहे. भारताच्या या यशात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आमच्या संघाला यश मिळत आहे, कारण आम्ही खेळपट्टीचा विचार करत नाही, असे प्रशिक्षक शास्त्री म्हणाले.

आम्ही खेळपट्टीचा अजिबात विचार करत नाही. सामना मुंबई, ऑकलंड, मेलबर्न किंवा आणखी कुठेही असो, आम्हाला २० विकेट्स मिळवायच्या आहेत, या मानसिकतेने आम्ही खेळतो. आमची फलंदाजी इतकी मजबूत आहे की आम्ही जेव्हा २० विकेट्स मिळवतो, तेव्हा आमचा संघ अगदी फेरारीप्रमाणे धावू लागतो. तुमच्या संघात २० विकेट्स मिळवून देणारे पाच गोलंदाज असणे गरजेचे असते, असे शास्त्री म्हणाले.

- Advertisement -

तसेच सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार मिळवणार्‍या रोहित शर्माचे कौतुक करताना शास्त्री म्हणाले, रोहितने या मालिकेत फारच अप्रतिम फलंदाजी केली. सलामीवीर म्हणून खेळताना त्याला मानसिकतेत बदल करण्याची गरज होती आणि त्याने ते केले. या खेळपट्टीवर सुरुवातीला फलंदाजी करणे अवघड होते, पण त्याने संयम दाखवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -