Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा कसोटीत बेन स्टोक्सची तुफानी फलंदाजी; षटकारांचा पाऊस पाडत 64 चेंडूत केली शतकी...

कसोटीत बेन स्टोक्सची तुफानी फलंदाजी; षटकारांचा पाऊस पाडत 64 चेंडूत केली शतकी खेळी

Subscribe

इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने कसोटी क्रिकेट तुफानी फलंदाजी केली आहे. स्टोक्सने काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन 2 मध्ये डरहॅमकडून वूस्टरशायरविरुद्ध खेळताना अवघ्या 64 चेंडूत शतक झळकावले.

इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने कसोटी क्रिकेट तुफानी फलंदाजी केली आहे. स्टोक्सने काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन 2 मध्ये डरहॅमकडून वूस्टरशायरविरुद्ध खेळताना अवघ्या 64 चेंडूत शतक झळकावले. विशेष म्हणजे स्टोक्सने डावखुरा फिरकी गोलंदाज जोश बेकरच्या एका षटकात 34 धावा काढत शानदार शतक केलं. स्टोक्सच्या या झंझावाती खेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या कसोटीतील डावाच्या 117व्या षटकात बेन स्टोक्स 59 चेंडूत 70 धावा केल्यानंतर फलंदाजी करत होता आणि त्याने फिरकी गोलंदाजावर सलग पाच षटकार मारले. मात्र षटकाचा पहिला चेंडू लाँगऑन वरुन गेला, तर पुढचा चेंडू स्टोक्सने डीप मिड-विकेटवर मारला. त्यानंतर पुढच्या तीन चेंडूंवरही स्टोक्सने असाच प्रहार केला. अखेर बेन स्टोक्स 88 चेंडूत 161 धावा करून बाद झाला.

- Advertisement -

स्टोक्सने आपल्या खेळीत 17 षटकार आणि 8 चौकार लगावले. स्टोक्सच्या या खेळीमुळे डरहमने पहिला डाव 580/6 वर घोषित केला. 31 वर्षीय स्टोक्सला गेल्या महिन्यात इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. बेन स्टोक्सने 2013 मध्ये कसोटी पदार्पण केले.

जूनमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान बेन स्टोक्स पूर्णवेळ कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. बेन स्टोक्सला घरच्या हंगामात सात कसोटी खेळायच्या आहेत, त्यातली एक भारताविरुद्धच्या आहे.


- Advertisement -

हेही वाचा – Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरचा पुढील सामन्यात समावेश होण्याची शक्यता, मुंबईच्या प्रशिक्षकांचा मोठा खुलासा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -