घरक्रीडाENG vs AUS Ashes Series : स्टोक्सने ५ षटकांत टाकले १४ नो...

ENG vs AUS Ashes Series : स्टोक्सने ५ षटकांत टाकले १४ नो बॉल; तिसऱ्या अंपायरनेही केले दुर्लक्ष

Subscribe

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मधील ब्रिस्बेन कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी आयसीसीच्या कित्येक नियमांचे उल्लंघन झाले आहे

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मधील ब्रिस्बेन कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी आयसीसीच्या कित्येक नियमांचे उल्लंघन झाले आहे. ते नियम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी बनवले गेले होते. पहिल्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्सने पहिल्या पाच षटकात तब्बल १४ नो बॉल टाकले. मैदानावरील अंपायर किंवा टीव्ही अंपायर दोघांनीही ते पाहण्याची जबाबदारी घेतली नाही. डेव्हिड वॉर्नर स्टोक्सच्या चेंडूवर बाद झाल्यावर ही बाब समोर आली. वॉर्नर बाद झाल्यानंतर त्याचा रिप्ले पाहिला असता गोलंदाजी करताना बेन स्टोक्सचा पाय मर्यादित रेषेच्या पुढे असल्याचे दिसून आले. ही बाब उघडकीस आल्यानंतर अधिकृत प्रसारक चॅनल-७ ने तपास सुरू केला आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले.

सुरुवातीला बेन स्टोक्सच्या त्याच षटकातील पहिले तीन चेंडूही नो बॉल असल्याची माहिती देण्यात आली. आयसीसीच्या नवीन नियमांनुसार गोलंदाजाचा पाय रेषेच्या पुढे आहे की नाही याची तपासणी करणे ही तिसऱ्या अंपायरची जबाबदारी आहे. जर पाय रेषेच्या पुढे असेल तर त्याला नो बॉल घोषित केले पाहिजे. जेव्हा हे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले तेव्हा असे दिसून आले की या सामन्यात तिसऱ्या अंपायरला ती तांत्रिक सुविधा देण्यात आलेली नव्हती. ज्याच्या सहाय्याने ते प्रत्येक चेंडूचा फूट ओव्हरस्टेप तपासू शकतात. हा सामना जुन्या नियमांनुसार खेळला जात आहे ज्या अंतर्गत फक्त बळी घेणारा चेंडू पुन्हा तपासण्याची परंपरा आहे.

- Advertisement -

दरम्यान, चॅनल-७ ने बेन स्टोक्सच्या पाचही षटकांचे नो-बॉल तपासले. ज्यामध्ये त्याचा पाय १४ वेळा रेषेच्या पुढे असल्याचे निदर्शनास आले. स्टोक्सला त्याची चूक वेळीच सांगितली असती तर डेव्हिड वॉर्नर अवघ्या १७ धावांवर बाद झाला नसता.

- Advertisement -

२०१९ मध्ये पहिल्यांदाच चाचणीच्या स्वरूपात टीव्ही अंपायरला प्रत्येक चेंडूचा नो बॉल तपासण्याचा अधिकार देण्यात आला होता. २०२० मध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेपासून बेन स्टोक्स आणि नो बॉलबाबत वाद याची नियमितपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३ च्या नियमांमध्ये हे देखील स्पष्ट केले आहे की प्रत्येक चेंडूवर गोलंदाजाचा पाय तपासणे ही तिसऱ्या अंपायरची जबाबदारी आहे.


हे ही वाचा: http://Bipin Rawat Chopper Crash: रावतांच्या मार्गदर्शनात धोनीने घेतली सैनिकी प्रशिक्षण, माहीने २ वर्षांपूर्वीच मागितली होती परवानगी


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -