घरक्रीडाIND vs ENG : स्टोक्सने मला शिवीगाळ केल्याने कोहलीला मध्यस्थी करावी लागली...

IND vs ENG : स्टोक्सने मला शिवीगाळ केल्याने कोहलीला मध्यस्थी करावी लागली – सिराज

Subscribe

स्टोक्सने आधी सिराजसोबत आणि मग कोहलीसोबत हुज्जत घातली.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीला गुरुवारपासून सुरुवात झाली. इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांतच आटोपला. या सामन्याच्या खेळपट्टीकडून फिरकीपटूंना मदत मिळाली. याचा फायदा घेत पहिल्या दिवशी भारताची फिरकी जोडगोळी अक्षर पटेलने चार, तर अश्विनने तीन विकेट घेतल्या. या दोघांना वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने दोन बळी घेत चांगली साथ दिली. सिराजने इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि अनुभवी फलंदाजी जॉनी बेअरस्टो या दोघांना पॅव्हेलियनचा रास्ता दाखवला. सिराजने त्याच्या चांगल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले, पण त्याच्यात आणि इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्समध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यावेळी स्टोक्सने सिराजला शिवीगाळ केल्याचे पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर सिराजने सांगितले.

स्टोक्सने कोहलीशीही हुज्जत घातली

सिराज आणि स्टोक्स यांच्या शाब्दिक चकमक झाल्यावर भारताचा कर्णधार विराट कोहलीला मध्यस्थी करावी लागली. ‘स्टोक्स मला शिवीगाळ करत होता. त्यामुळे विराटला मध्यस्थी करावी लागली. त्याने ती परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली,’ असे सिराज म्हणाला. तसेच कोहलीने मध्यस्थी केल्यावर स्टोक्सने त्याच्याशीही हुज्जत घातल्याचे पाहायला मिळाले. अखेर पंच नितीन मेनन यांनी मध्ये येऊन या दोघांना शांत केले. सर्व प्रकार इंग्लंडच्या डावातील १३ व्या षटकात घडला.

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -