घरक्रीडाRanji Trophy 2022: बंगालचे क्रिडा मंत्री रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत खेळणार, संघात...

Ranji Trophy 2022: बंगालचे क्रिडा मंत्री रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत खेळणार, संघात मिळाले स्थान

Subscribe

देशातील सर्वात महत्त्वाची स्पर्धा असलेल्या रणजी करंडक स्पर्धेवरही कोरोनाचे संकट घोंघावत आहे. रणजी स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे १० दिवस शिल्लक आहेत. परंतु बंगालच्या रणजी संघातील सात सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईचा अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबे आणि संघाचे एक व्हिडिओ निरिक्षक यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दुबेच्या जागी साईराज पाटीलला मुंबईच्या संघात स्थान देण्यात आलं आहे. मात्र, बंगालचे क्रीडा मंत्री आणि भारताचा क्रिकेटपटू मनोज तिवारी यांची संघात निवड करण्यात आली आहे. त्यांनी मागील वर्षात तृणमुल काँग्रेस पक्षाकडून राजकारणात प्रवेश केला होता. तसेच ३६ वर्षीय मनोजने भारतीय संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे. रणजी करंडक स्पर्धेत बंगाल टीमला ‘ब’ गटात स्थान मिळाले आहे.

- Advertisement -

पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री

रणजी करंडक स्पर्धेत एन्ट्री घेणारे मनोज तिवारी आता पुन्हा एकदा मैदानावर खेळताना दिसणार आहेत. काही दिवसांमध्येच आयोजित करण्यात येणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेत बंगाल टीमने घोषणा केली आहे. सध्या मनोज तिवारी पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर लढवली निवडणूक

पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतून त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांनी भाजप नेते रतिन चक्रवर्ती यांना सहा हजार मतांनी हरवलं होतं. मनोज तिवारीने २०२० मध्ये बंगालसाठी शेवटचा सामना खेळला होता. बंगालच्या कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या खेळाडूंपैकी सुदीप चॅटर्जी, अनुस्तूप मझुमदार, काझी जुनैद सैफी आणि गीत पुरी यांचा देखील समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Bully Bai App Controversy: बंगळुरूनंतर उत्तराखंडमधून एक महिला ताब्यात, मुंबई सायबर सेलची मोठी कारवाई


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -