मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने 184 धावांनी भारतावर विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पराभवासाठी भारतीय संघाला 340 धावांचे आव्हान पार करायचे होते. पण भारतीय संघाला 155 धावांपर्यंतच मजल मारता आली. परिणामी 155 धावांवर सर्वबाद करत ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. तसेच, पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील अंतिम सामाना बाकी असून, हा सामना बाकी 3 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे. (BGT Ind vs aus 4th test match australia defeat india by 184 runs)
चौथ्या कसोटी सामन्यात 340 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने विजयासाठी भारतासमोर ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण डाव 155 धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 84 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पहिल्या डावात 369 धावा केल्या होत्या. नितीश रेड्डी यांच्या शतकी खेळीमुळे भारताला फॉलोऑन वाचवण्यात यश आले. दुसऱ्या डावाची वेळ आली तेव्हा कांगारू संघाने 234 धावा केल्या, त्यामुळे चौथ्या डावात भारताला 340 धावांचे मोठे लक्ष्य मिळाले होते.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात आघाडीच्या फलंदाजांच्या संथ फलंदाजीचा फटका भारतीय संघाला बसला. नाणेफेकीचा कौल जिंकत ऑस्ट्रेलियाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम गोलंदाजीसाठी भारतीय संघाला मैदानात यावं लागलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 474 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला चांगली सुरूवात करता आली नाही. परंतू, अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघाला पहिल्या डावात चांगली झुंज देता आली.
Incredible scenes in Melbourne as Australia clinch the fourth Test 🎉#WTC25 | #AUSvIND pic.twitter.com/5gqRYRTzLQ
— ICC (@ICC) December 30, 2024
नितीश कुमार रेड्डीच्या खेळीच्या जोरावल भारताने पहिल्या डावात 369 धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने या धावांच्या पुढे खेळताना 234 धावांची खेळी केली. शेवटाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलाच समाचार घेतला. तसेच भारतासमोर पाचव्या दिवशी 340 धावांचे मोठे आव्हान ठेवले. 340 धावांचं हे आव्हान पार करणं शक्य नसल्याने भारतीय संघासमोर सामना ड्रॉ करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याचदिशेने भारताने फलंदाजीला सुरूवात केली पण आघाडीच्या फलंदाजांना चांगली सुरूवात करता आली नाही. परिणामी भारतीय संघ 155 धावांवर सर्वबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने 184 धावांनी विजय मिळवला.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
ऑस्ट्रेलिया संघ : उस्मान ख्वाजा, सॅम कोनस्टास, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरे (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नाथन लायन, स्कॉट बोलँड
भारतीय संघ : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप
हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहची नव्या विक्रमाला गवसणी; दिग्गज गोलंदाजांना टाकलं मागे