Homeक्रीडाBGT IND vs AUS : भारताचा प्रशिक्षक 'गंभीर', खेळ न दाखवल्यास खेळाडूंना...

BGT IND vs AUS : भारताचा प्रशिक्षक ‘गंभीर’, खेळ न दाखवल्यास खेळाडूंना मिळणार धन्यवाद देण्याचा इशारा

Subscribe

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना नुकताच झाला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर दमदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे ही मालिका आता 2-1 अशा बरोबरीवर आहे.

मुंबई : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना नुकताच झाला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर दमदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे ही मालिका आता 2-1 अशा बरोबरीवर आहे. पण चौथा सामना हा भारताला सहज जिंकता नसता, पण ड्रॉ करणं शक्य होतं. परंतू, भारतीय संघाला सामना अनिर्णित ठेवण्यापर्यंत खेळी करता आली नाही. परिणामी भारत पराभूत झाला. मात्र, या पराभवानंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर हा संघातील खेळाडूंवर चांगलाच संतापला आहे. विशेष म्हणजे आता बस झालं… आता इथून पुढील सामन्यांमध्ये जो परिस्थितीनुसार खेळणार नाही त्यांना धन्यवाद सांगण्यात येईल, असा थेट इशारा गंभीरने दिला आहे. (BGT IND vs AUS Team India Head Coach Gautam Gambhir Warning To Players After Lost Fouth Test Match)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला. या पराभवानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंगरूममध्ये तणावपूर्वक वातावरण पाहायला मिळत आहे. संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आक्रमक झाला असून त्याने संघाचा समाचार घेतला. मात्र कोणत्याही खेळाडूचं नाव त्याने घेतलं नाही. परंतू, आता बस झालं…, असं म्हणत खेळाडूंना इशारा दिला आहे. त्यानुसार, “आता इथून पुढील सामन्यांमध्ये जो परिस्थितीनुसार खेळणार नाही त्यांना धन्यवाद सांगण्यात येईल. संघातील खेळाडू परिस्थितीनुसार खेळत नसून ते त्यांचा नैसर्गिक खेळ खेळत आहेत. त्यामुळे आता संघातील प्रत्येक खेळाडूनं कसं खेळायचं हे मी ठरवणार आहे. बांगलादेशमधील मालिकेनंतर फलंदाजीमध्ये खराब प्रदर्शन झालं आहे”, अशा शब्दांत खेळाडूंना गौतम गंभीरने समज दिली आहे.

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने 184 धावांनी भारतावर विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पराभवासाठी भारतीय संघाला 340 धावांचे आव्हान पार करायचे होते. पण भारतीय संघाला 155 धावांपर्यंतच मजल मारता आली. परिणामी भारतीय संघ 155 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात आघाडीच्या फलंदाजांच्या संथ फलंदाजीचा फटका भारतीय संघाला बसला. नाणेफेकीचा कौल जिंकत ऑस्ट्रेलियाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम गोलंदाजीसाठी भारतीय संघाला मैदानात यावं लागलं. दरम्यान, या मालिकेतील अंतिम सामाना बाकी असून, हा सामना बाकी 3 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे.


हेही वाचा – Rohit Sharma : जेव्हा आम्ही संघ म्हणून…; कर्णधार रोहित शर्माने सांगितले पराभवाचे कारण