Homeक्रीडाBGT Trophy 2025 : WTC फायनलच्या शर्यतीतून भारतीय संघ बाहेर; SA vs...

BGT Trophy 2025 : WTC फायनलच्या शर्यतीतून भारतीय संघ बाहेर; SA vs AUSमध्ये रंगणार अंतिम सामना

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होती. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 3-1 च्या फरकाने भारताचा पराभव केला. या पराभवामुळे भारताचं बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील अंतिम सामना खेळण्याचं मोठं स्वप्न भंगलं आहे.

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होती. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 3-1 च्या फरकाने भारताचा पराभव केला. या पराभवामुळे भारताचं बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील अंतिम सामना खेळण्याचं मोठं स्वप्न भंगलं आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा अंतिम सामना होणार आहे. (BGT Trophy 2025 India lose against Australia the final match between aus vs sa)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला पाचवा कसोटी सामना सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला गेला. भारतीय संघाला ही मालिका बरोबरीत संपवण्याकरीता कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिकणं गरजेचे होते. पण अवघ्या तीन दिवसांतच भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवरही परिणाम झाला आहे. परिणामी, भारत 2023-25 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

दरम्यान, भारतीय संघ पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेतून बाहेर गेला असेल, याआधी दोन्हीवेळा भारतीय संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. यंदा भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साखळी सामन्यांमध्ये विशेष कामगिरी करता आली नाही. भारताने ऑस्ट्रेलिया बरोबरच नाही तर न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिकाही गमावली.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25मधील भारताची कामगिरी

  • वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ची सुरुवात भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने केली होती. भारतीय संघाने ही मालिका 1-0 ने जिंकली.
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेली 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली.
  • भारतीय संघाचा सामना इंग्लंडशी झाला. भारताने ही मालिका 4-1 ने जिंकली.
  • 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतही बांगलादेशचा 2-0 असा पराभव केला.
  • त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला
  • आता ऑस्ट्रेलियाविरुद्धही पराभव पत्करावा लागला.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकामध्ये अंतिम सामना

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने आधीच अंतिम सामन्यात आपलं स्थान पक्कं केलं होतं. आता ऑस्ट्रेलियानेही अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे.


हेही वाचा – Yuzvendra Chahal Dhanashree Verma : चहलने इन्स्टावरून काढले फोटो अन्…; पुन्हा एकदा घटस्फोटाची चर्चा

Vaibhav Patil
Vaibhav Patil
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.