घरक्रीडाIPL 2022 SRH vs DC: दिल्लीविरूद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारची उत्कृष्ट कामगिरी, इरफान...

IPL 2022 SRH vs DC: दिल्लीविरूद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारची उत्कृष्ट कामगिरी, इरफान पठाणच्या विक्रमाशी केली बरोबरी

Subscribe

हैदराबाद आणि दिल्ली यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीने हैदराबादचा २१ धावांनी पराभव केला. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. यावेळी दिल्ली गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. हैदराबादचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारसाठी हा सामना खूप खास होता. हैदराबादच्या विजयात वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्यानं चार ओव्हर्स टाकून २५ धावा दिल्या होत्या. ज्यामध्ये एका निर्धाव षटकाचा समावेश होता. या निर्धाव षटकासह भुवनेश्वर कुमारने आयपीएलमधील खास विक्रमाला गवसणी घातली आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव षटक टाकणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत भुवनेश्वर कुमार दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याने आयपीएलच्या कारकिर्दीत आतापर्यंत १० निर्धाव षटक टाकले आहेत. तर इरफान पठाणनंही त्याच्या आयपीएलच्या कारकीर्दीत १० निर्धाव षटक टाकले आहेत. या यादीत भारताचा वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार अव्वल स्थानी आहे.

- Advertisement -

मेडन ओव्हर्स फेकण्यात भुवनेश्वरचा विक्रम

दिल्लीविरूद्ध १ मेडम ओव्हर टाकल्यानंतर त्याने आयपीएलमधील मेडन ओव्हर्सची संख्या १० वर गेली आहे. आयपीएलमध्ये असे करणारा तो दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. प्रवीण कुमार पहिल्या क्रमांकावर आहे. ज्याने १४ मेडन ओव्हर्स टाकल्या आहेत. भारतीय गोलंदाज इरफान पठाणही तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. लसिथ मलिंगा, संदीप शर्मा, धवल कुलकर्णी अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव षटक करणारे गोलंदाज –

प्रवीण कुमार – १४
भुवनेश्वर कुमार – १०
इरफान पठाण – १०
लसिथ मलिंगा – ८
संदीप शर्मा – ८
धवल कुलकर्णी – ८
डेल स्टेन – ७

- Advertisement -

आयपीएल २०२२ च्या पंधराव्या हंगामात भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. भुवीने १० सामन्यात १० गडी बाद केले आहेत. यादरम्यान, एका सामन्यात २२ धावांमध्ये ३ विकेट्स घेऊन त्याने सर्वोत्तम कामगिरी केली आहे.


हेही वाचा : वाझे, परमबीर नंतर पोलिसातील नवा लेटर बॉम्ब, IPS कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटींची वसुली


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -