भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेनंतर आता या दोन संघांमध्ये वनडे मालिका सुरू होणार आहे. टी-२० मालिका भारतीय संघाने कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळली. मात्र वनडे मालिका भारतीय संघ कर्णधार शिखर धवनच्यान नेतृत्वाखाली खेळणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेनंतर आता या दोन संघांमध्ये वनडे मालिका सुरू होणार आहे. टी-२० मालिका भारतीय संघाने कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळली. मात्र वनडे मालिका भारतीय संघ कर्णधार शिखर धवनच्यान नेतृत्वाखाली खेळणार आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात ५ मोठे बदल करण्यात आले आहेत. हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, इशान किशन, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज यांच्या जागी शार्दुल ठाकूर, कुलदीप सेन, शाहबाज अहमद आणि दीपक चहर यांचा भारतीय संघाच्या वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. (Big Changes in Team India for ind vs nz odi series schedule squads live streaming)

टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने ३ टी-२० सामन्यांची मालिका १-० ने जिंकली आहे. त्यानंतर भारत आता न्यूझीलंडविरुद्ध ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेला २५ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. वनडे मालिकेत शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना २५ नोव्हेंबर रोजी ऑकलंडमध्ये खेळवला जाणार आहे. दुसरा वनडे २७ नोव्हेंबर रोजी हॅमिल्टन येथे होणार आहे. तसेच, तिसरा आणि अखेरचा सामना ३० नोव्हेंबर रोजी ख्राइस्टचर्च येथे होणार आहे. हे तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ७ वाजता सुरू होणार आहेत.

सामना कुठे पाहणार?

  • ‘डीडी फ्री डिश’
  • डीडी स्पोर्ट्स वाहिनी
  • अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप यादव. सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघ

केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी.


हेही वाचा – वर्षभरात टी-२०मध्ये सूर्यकुमार यादवच्या १०००+ धावा; ठरला पहिला भारतीय खेळाडू