घरक्रीडाBishan Singh Bedi 75 : बिशन सिंह बेदी पंच्याहत्तरीत, अभिनव बिंद्राचे भावनिक...

Bishan Singh Bedi 75 : बिशन सिंह बेदी पंच्याहत्तरीत, अभिनव बिंद्राचे भावनिक पत्र

Subscribe

ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्रा यांनी आपले हिरो असणाऱ्या भारतीय माजी क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांना ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देणारे असे एक पत्र लिहिले. बिंद्रा यांनी पत्र लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. क्रिकेटसारख्या खेळात अतिशय ईमानदारी आणि स्पष्टता असणारा खेळाडू म्हणून बिशन सिंह बेदी यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. आरोग्यासाठी शुभेच्छा देतानाच लवकरच ठीक व्हा असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

एखाद्या खेळाडूला बाद करण्यासाठी नाना प्रकारच्या क्ल्युप्त्या लढवण्याची कला ही अतिशय आश्चर्यचकित करणारी होती, पण तितकीच ही कला नैतिकदृष्ट्याही तितकीच भावणारी अशी होती. एक क्रिकेट खेळाडू म्हणून आपली खेळातील महान खेळाडू म्हणून गणना ही केवळ तुमच्या उदारतेमुळे आणि अनेक अगणित अशा किश्शांमुळेच आहेत. ही महानता एखाद्या वारशासारखी आहे. पण खेळातील ईमानदारी आणि स्पष्टता ही वैयक्तिक चारित्र्याचे दर्शन घडवते. म्हणूनच क्रिकेटचा हा जादूगार लवकरच बरा व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

बीसीसीआयने केलेल्या ट्विटमध्ये बिशन सिंह बेदी यांनी ७७ आंतरराष्ट्रीय सामने खेळत २७३ खेळाडू बाद केल्याची माहिती आहे. तसेच वाढदिवसाच्याही अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन तेंडूलकरनेही बिशन सिंह बेदींना शुभेच्छा दिल्या आहेत. तर आयसीसीनेही बिशन सिंह बेदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्पिन बॉलिंग रॉयल्टी असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. बिशन सिंह बेदी यांनी १५६० विकेट्स प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये घेतल्या. तर २८.७१ सरासरीने २६६ धावा केल्या. स्पिन बॉलिंग रॉयल्टीचे बिशन सिंह बेदींना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या सरळ स्वभावासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बिशन सिंह बेदी यांचा जन्म हा १९४६ साली झाला होता. त्यांनी ६७ सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३७० सामन्यात त्यांनी १५६० विकेट्स घेतल्या.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2021 : जसप्रीत बुमराह एलीट १०० क्लबमध्ये दाखल


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -