घरक्रीडाराजे परमार पालघर श्री

राजे परमार पालघर श्री

Subscribe

योगेश मेहेर दिव्यांगात अव्वल

पालघर आणि ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर्स फिटनेस असोसिएशन असोसिएशन, रांगडे जिमनॅशियम, नालासोपारा आणि बहुजन विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने नालासोपारा पूर्व येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात शरीर सौष्ठव राज्यस्तरीय स्पर्धा झाली. एकूण आठ वजनी गटात झालेल्या या स्पर्धेतील मानाचा असा मॅन फिजिक्स पालघर श्री 2020 हा किताब बी फिटच्या राजे परमार याने पटकावला. तर मास्टर पालघर श्री किताब भांबले जिमच्या चिराग पाटील याने जिंकला.

दिव्यांग सौष्ठवपटुंच्या गटात टोटल फिटनेसचा योगेश मेहेर हा दिव्यांग पालघर श्री चा मानकरी ठरला. सुधाकर पवार (फिनिक्स जिम), मीता घुरघूस (भावर जिम.), राहूल म्हात्रे ( रांगडे जिम.), विनायक जाधव(रॉयल फिटनेस), हर्षल वैती ( सुनील जिम), राजे परमार (बी फिटनेस), योगेश मेहेर (टोटल फिटनेस), चिराग पाटील (भांबले जिम ), या शरीरसौष्ठवपटुंनी आपल्या गटातील विजेतेपद पटकावले.

- Advertisement -

अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेला जशी स्पर्धकांची मोठी गर्दी होती तशीच ती स्पर्धा बघणार्‍या रसिकांचीसुद्धा होती. रांगडे जिमने स्पर्धा व्यवस्थापन सांभाळले. आमदार क्षितीज ठाकूर, युवा आघाडी प्रमुख सिद्धार्थ ठाकूर, प्रभाग समिती सभापती निलेश देशमुख, माजी नगराध्यक्ष राजेश रोडे, युवाचे नालासोपारा अध्यक्ष पंकज देशमुख, माजी नगरसेवक अ‍ॅड.रमाकांत वाघचौडे, परेश पाटील, बन्सनारायण मिश्रा आदी मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली. युवा आघाडीचे पदाधिकारी किशोर काकडे, माजी नगरसेवक किरण काकडे यांनी पुढाकार घेऊन ही स्पर्धा भरविली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -