बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने केलेली मेजवानी पाहून तुमच्या तोंडालाही पाणी सुटेल.
सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या जवळच्या आणि खास लोकांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. काही जण आपले छंद जोपासत आहेत तर काही जण आपल्या कलागुणांना वाव देत आहेत. त्यातच आज राम नवमी आहे. त्यामुळे अनेकांच्या घरी गोडाधोडाचे पदार्थ केले जात आहेत. मात्र, यामध्ये बॉलीवूड कलाकारही काही मागे नाहीत हा. कारण सर्वांची लाडकी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील आज रामनवमी निमित्त खास अशी मेजवानी तयार केली आहे. विशेष म्हणजे तिने स्वत: तयार केलेल्या मेजवानीचा फोटो देखील तिने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
छोले भटूर आणि हलव्याची मेजवानी
- Advertisement -
अनुष्काने रामनवमीनिमित्त खास असे छोले भटूरे आणि हलवा तयार केला आहे. विशेष म्हणजे तिने त्याचे फोटो शेअर करत ‘Happy ram navami’ अशी कॅप्शन देखील दिली आहे. ही मेजवानी पाहून तुमच्या तोंडाला पाणी तर नक्कीच सुटेल. त्याचप्रमाणे तिने तिच्या चाहत्यांना राम नवमीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
दरम्यान, कोरोनामुळे अनेकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे अनुष्का देखील तिचा पती विराट कोहलीसोबत आपला वेळ घालवताना दिसत आहे.
तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी कोरोनाविरोधातील लढाईसाठी देशवासियांना मदत केली आहे. मात्र, त्यांनी किती मदत केली आहे. हे सांगितलेले नाही.