घरक्रीडासुरेश रैनाने आपल्या बायोपिकसाठी बॉलिवूड ऐवजी साउथच्या 'या' अभिनेत्यांची केली निवड

सुरेश रैनाने आपल्या बायोपिकसाठी बॉलिवूड ऐवजी साउथच्या ‘या’ अभिनेत्यांची केली निवड

Subscribe

भारतीय क्रिकेटर सुरेश रैना लवकरच आपला बायोपिक करण्याच्या तयारीत आहेत. याबाबतचा खुलासा सुरेश रैनाने इन्स्टाग्रामवरील एका लाईव्ह सेशन दरम्यान केला. शिवाय सुरेश रैनाने त्याची भूमिका कोणी करावी हे देखील इच्छा व्यक्त केली. रैनाने आपल्या भूमिकेसाठी दोन साउथच्या अभिनेत्यांची निवड केली आहे. त्याचे म्हणणे आहे की, त्याची भूमिका साउथच्या कलाकाराने करावी, जेणेकरून त्याचे चेन्नईसोबत असलेले गहिरे कनेक्शन चांगल्या प्रकारे समजू शकतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suresh Raina (@sureshraina3)

सुरेश रैनाच्या चेन्नई हृदयाच्या खूप जवळ आहे, कारण तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससोबत बऱ्याच काळापासून खेळत आहे. या टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी जो रैनाचा खूप चांगला मित्र आहे. अलीकडेच सुरेश रैनाचे Believe : What Life and Cricket Taught Me या नावाचे पुस्तक प्रदर्शित झाले. यामध्ये आयुष्य आणि क्रिकेटने त्याला जे धडे दिले आहेत, त्याबद्दल सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suresh Raina (@sureshraina3)

- Advertisement -

यादिवसात सुरेश रैनाने आपल्या पुस्तकाचे जोरदार प्रमोशन केले. त्यामुळे अनेक सोशल मीडिया लाईव्हवर सुरेश रैना यादिवसात दिसत आहे. अशाच प्रकारे रैनाने लाईव्ह सेशनदरम्यान कमेंटेटर भावना बालाकृष्णनसोबत बातचित केली. त्यादरम्यान रैनाने आपला बायोपिक करावा अशी इच्छा व्यक्त केली. या बायोपिकसाठी रैनाने बॉलिवूड ऐवजी साउथ अभिनेत्यांची निवड केली आहे. रैनाला असे वाटते की, त्याची भूमिका साउथ अभिनेता सूर्या किंवा दुलकर सलमान याने करावी.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -