IPL सामन्यावर ऑनलाईन बेटींग घेणार्‍या बुकीला अटक, २ दिवसांची पोलीस कोठडी!

सध्या समस्त जगाला कोरोना विसरायला भाग पाडलाय तो आयपीएलने. सगळीकडेच आयपीएलने वातावरण बदलल आहे. सगळेच या आयपीएलमध्ये गुंतले आहेत. प्रेक्षक घरी बसून या आयपीएलचा आनंद घेत आहेत. मग घरतल्या घरातच दोन टीम पडतात आणि आयपीएलची खरी मजा येते. पण आयपीएल सुरू झाली आणि सामन्यावर बेटींगही सुरू झालं.

आयपीएलच्या मंगळवारी खेळविण्यात आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल यांच्यातील सामन्यावर मालाड येथील फ्लॅटमध्ये ऑनलाईन बेटींग घेणार्‍या संदीप मदनराज दोशी नावाच्या एका बुकीला गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सध्या दुबईत आयपीएलचे सामने खेळविण्यात येत आहे. मंंगळवारी सीएसके आणि आरआर यांच्यात सामना होता. या सामन्यावर मालाड परिसरात काहीजण बेटींग घेत आहेत अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी मालाड येथील मार्वे रोड, मिठ चौकीजवळील गंगा सहकारी सोसायटीच्या रुम क्रमांक सोळामध्ये छापा टाकला होता, यावेळी तिथे संदीप दोशी हा बेटींग घेताना दिसून आला. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी टिव्ही, मोबाईलसह बेटींगसंदर्भातील साहित्य जप्त केले आहेत. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने शुक्रवार २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही बुकींचे नाव समोर आले असून त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.


हे ही वाचा – जबरदस्त! चीनला टक्कर देण्यासाठी जिओचा स्वस्त स्मार्टफोन, ५ हजारांपेक्षाही कमी किंमतीत