शाहिद आफ्रिदीने दिले क्रिस गेलला ‘हे’ चॅलेंज!

ख्रिस गेलने नुकत्याच बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय लढतीत अप्रतिम खेळी करत शाहिद आफ्रिदीचा ४७६ सिक्सचा विक्रमाशी बरोबरी केली, यावेळी शाहिदने आपल्या ट्विटर हँडलवरून गेलला माझ्यासोबत सिंगल विकेट मॅच खेळ असे चॅलेन्ज दिले आहे.

shahid afridi vs chris gayle
शाहीद आफ्रिदी आणि ख्रिस गेल

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज बॅट्समन आणि युनिव्हर्सल बॉस म्हणून संबोधल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने नुकत्याच बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय लढतीत अप्रतिम खेळी करत शाहिद आफ्रिदीच्या सर्वाधिक ४७६ सिक्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. यावेळी शाहिदने आपल्या ट्विटर हँडलवरून गेलला माझ्यासोबत सिंगल विकेट मॅच खेळ, असे चॅलेंज दिले आहे.

नक्की का दिला शाहिदने असा रिप्लाय

वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यातील तिसऱ्या सामन्यात ख्रिस गेलने तुफान फटकेबाजी करत ६६ चेंडूंत ७३ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ५ सिक्स आणि ६ फोरचा समावेश होता. गेलने सामन्यातील ५ वा सिक्स मारत आफ्रिदीच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या ५२४ सामन्यातील ४७३ सिक्सच्या विक्रमाशी गेलने ४४३ सामन्यात बरोबरी केली आहे. यानंतर एका पत्रकार परिषदेत बोलताना गेलने सांगितले की, “शाहिद आफ्रिदी आणि मी आम्ही दोघेही प्रेक्षकांना करमणूक करायला खेळतो. त्याचसोबत मी आता आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. पण त्याने घाबरायचे कारण नाही मी आता अजून सिक्स मारणार नाही” गेलचे हे विधान क्रीडा पत्रकार सज सादिक यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट करताच आफ्रीदीने त्या ट्विटला रिप्लाय देत गेलला सिंगल विकेट मॅच खेळायचे आव्हान दिले आहे.

नक्की काय आहे आव्हान

गेलने आफ्रिदीच्या सर्वाधिक सिक्सच्या विक्रमाशी बरोबरी करताच आपण यापुढे सिक्स मारणार नाही त्यामुळे आफ्रिदीने घाबरू नये, अशी कोपरखळी आफ्रिदीला मारली होती. हेच विधान क्रीडा पत्रकार सज सादिक यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केले तेव्हा आफ्रिदीने सादिक यांच्या पोस्टला रिप्लाय देताना लिहिले की,”युनिव्हर्सल बॉसकडून माझा रेकॉर्ड तुटत असेल तर मला काही काळजी करायचे कारण नाही, तो या रेकॉर्डच्या पात्रतेचा आहे, पण तरी त्याने माझ्यासोबत एक सिंगल विकेट मॅच खेळावी, तेव्हा बघुया कोण जास्त सिक्स मारतं”

बुम बुम आफ्रिदीच्या या रिप्लायची सध्या सोशल मीडियावर तसेच क्रिकेट जगतात चांगलीच चर्चा होत असून आता युनिव्हर्सल बॉस गेल याला काय रिप्लाय करतोका हे पाहणे औत्सुक्याचे राहील.