Homeक्रीडाBGT IND vs AUS : भारताच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पराभवाचं कारण समोर;...

BGT IND vs AUS : भारताच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पराभवाचं कारण समोर; वाचा सविस्तर

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने 3-1 अशा फरकाने भारतावर विजय मिळवला. योग्य कामगिरी न झाल्याने भारत पराभूत झाल्याचे बोलले जात होते, पण भारताच्या पराभवाचं कारण समोर आलं आहे.

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने 3-1 अशा फरकाने भारतावर विजय मिळवला. योग्य कामगिरी न झाल्याने भारत पराभूत झाल्याचे बोलले जात होते, पण भारताच्या पराभवाचं कारण समोर आलं आहे. त्यानुसार, भारताच्या या पराभवामागे फलंदाज असल्याचे मानले जात आहे. फलंदाजांसोबतच भारतीय गोलंदाजही जबाबदार आहेत. जसप्रीत बुमराह वगळता इतर सर्व गोलंदाजांनी निराशा केली. या पराभवामुळे भारताला केवळ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच नाही तर, 2025 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यालाही मुकावे लागले. (Border Gavaskar Trophy 2024 25 India vs Australia BGT Pace Attack stats and comparison)

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर संपूर्ण मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी 1 ते 30 षटकात 35 विकेट्स घेतल्या आहेत. तर भारतीय गोलंदाजांनी 34 विकेट घेतल्या. मात्र 31 ते 80 षटकांमध्ये फरक दिसून आला. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी या कालावधीत गोलंदाजी करताना एकूण 35 बळी घेतले, तर या षटकांमध्ये भारताला केवळ 22 विकेट मिळाल्या. भारतीय गोलंदाजांचा इकॉनॉमी रेटही 3.5 पेक्षा जास्त होता. या षटकांमध्ये खेळ नियंत्रित केला जातो. पण भारतीय गोलंदाज नेमके इथेच मागे पडले. या षटकांमध्ये भारताचा सरासरी आणि स्ट्राईक रेटही जास्त होता. तथापि, 81 षटकांनंतर, ऑस्ट्रेलियाच्या 4 विकेट्सच्या तुलनेत भारताने 15 विकेट्स घेतल्या.

या कसोटी मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पहिली 30 षटके गोलंदाजी करताना एकूण 16 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी 11 विकेट्स घेता आल्या. पॅट कमिन्सने 10 आणि स्कॉट बोलंडने 9 विकेट घेतल्या.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अतितटीचा सामना 31 आणि 80 षटकांमध्ये पाहायला मिळाला. कारण ऑस्ट्रेलियासाठी या षटकांमध्ये पॅट कमिन्सने एकूण 13 बळी घेतले. तसेच, स्कॉट बोलँडने 3 सामन्यात 12 बळी घेतले. परंतू, भारताकडून जसप्रीत बुमराह याने निश्चितपणे कमी गोलंदाजी केली. त्याला केवळ 8 विकेट घेता आल्या. मिचेल स्टार्कने 7 आणि नितीश रेड्डी याने 5 विकेट घेतल्या. त्याचवेळी मोहम्मद सिराजला जुन्या चेंडूवर केवळ 4 विकेट मिळाल्या.


हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी जवळ आली तरी…; पाकिस्तान यजमानपद गमावण्याची शक्यता