घर क्रीडा धोनीला पाहण्यासाठी गर्लफ्रेण्डची डेट मिस !

धोनीला पाहण्यासाठी गर्लफ्रेण्डची डेट मिस !

Subscribe

दोन वर्षांच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या चेन्नईची कामगिरी शानदार झाली आहे. आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारी चेन्नईची टीम दुसरी आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची कामगिरीही यावर्षी उत्तम झाली आहे. त्यामुळे धोनीचा करिश्मा अजूनही कायम आहे असेच म्हणावे लागेल. 36 व्या वर्षीही धोनी युवकासारखीच कामगिरी करत आहे. म्हणूनच धोनीचे चाहते फक्त भारतातच नाहीत तर परदेशातही दिसून येतात. एका चाहत्याने धोनीला पाहण्यासाठी आपल्या गर्लफ्रेण्डला दिलेली डेट मिस केली.

- Advertisement -

यंदाच्या संपूर्ण मोसमातच धोनीला सपोर्ट करणारे फॅन अतरंगी शक्कल लढवत आहेत. सगळ्याच स्टेडियमध्ये वेगवेगळ्या प्रकारे धोनीचे चाहते त्याचे स्वागत करताना दिसत आहेत. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात असाच एक फॅन आगळवेगळे पोस्टर घेऊन आला होता. धोनीला पाहण्यासाठी मी माझ्या गर्लफ्रेंडसोबतची डेट मिस करत आहे, असा बॅनर घेऊन एक चाहता दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये आला होता. चेन्नईच्या टीमने त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून हा फोटो शेअर केला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -