घरक्रीडापाकिस्तानवर दक्षिण आफ्रिकेसारखाच बहिष्कार घाला !

पाकिस्तानवर दक्षिण आफ्रिकेसारखाच बहिष्कार घाला !

Subscribe

विनोद राय यांची मागणी

वर्णभेदामुळे ज्याप्रकारे दक्षिण आफ्रिकेवर बहिष्कार घालण्यात आला होता, त्याचप्रकारची कारवाई दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानवरही करण्यात यावी, अशी मागणी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर आगामी विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळू नये अशी मागणी जोर धरु लागली. या सामन्याबाबतचा निर्णय हा सरकारशी चर्चा केल्यानंतरच बीसीसीआय घेणार असली तरी, आम्ही आयसीसीच्या सदस्य देशांसमोर दशतवादाला प्रोत्साहन देणार्‍या देशाबरोबर संबंध ठेवू नयेत, हा मुद्दाही योग्य मंचावर उपस्थित करणार आहोत, असे राय यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

पाकिस्तानविषयी रविवारी राय म्हणाले, जर आपण पाकिस्तानसोबत खेळलो नाही तर आपणच आपल्या पायावर कुर्हाड मारुन घेतल्यासारखे होईल. पण, पाकिस्तान या देशाच्या क्रिकेट संघावर बंदी आणणे हे आमचे लक्ष्य आहे. तसेच क्रिकेट खेळणार्‍या इतर सर्व देशांनी पाकिस्तानसोबत संबंध तोडायला हवेत.

- Advertisement -

राय यांनी पाकिस्तानवर बंदीची मागणी करताना द.आफ्रिकेचे उदाहरण दिले. १९७० ते १९९१ या २१ वर्षांच्या कालावधीत वर्णभेदी नितीमुळे दक्षिण आफ्रिकेवर बहिष्कार घालण्यात आला होता. या पद्धतीचीच कारवाई पाकिस्तानवर करायला हवी असे मला वाटते. पाकिस्तानला सर्व क्रीडा स्पर्धांसाठी प्रतिबंधित करायला हवे, जसे दक्षिण आफ्रिकेला केले होते, असे राय म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -