घरक्रीडाआता ओप्पोच्या जागी बायजू

आता ओप्पोच्या जागी बायजू

Subscribe

विश्वचषक न जिंकल्याची निराशा विसरून आता विराट कोहलीचा भारतीय संघ आगामी वेस्ट इंडिज दौर्‍याच्या तयारीला लागला आहे. हा दौरा संपल्यानंतर भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर सामने खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपासून भारतीय संघाच्या जर्सीवर नवीन ब्रँडचे नाव दिसणार आहे. भारताच्या जर्सीवर आतापर्यंत ओप्पो या चिनी मोबाइल कंपनीचे नाव वापरले जात होते. या कंपनीने मार्च २०१७ मध्ये पाच वर्षांसाठी १०७९ कोटी रुपयांना टायटल प्रायोजक म्हणून हक्क विकत घेतले होते. मात्र, आता भारतीय संघाच्या जर्सीवर ओप्पोची जागा बायजू घेणार आहे, अशी अधिकृत घोषणा बीसीसीआयने गुरुवारी केली.

१५ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा सुरु होणार आहे. या दौर्‍यात ३ टी-२०, ३ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने होणार आहेत. या दौर्‍यापासून टीम इंडियाच्या जर्सीमध्ये बदल दिसून येणार आहे. मार्च २०१७ मध्ये ओप्पोने निविदा प्रक्रियेत भारतीय संघाच्या प्रयोजकत्वाचे हक्क वर्षाच्या कालावधीसाठी खरेदी केले होते. त्यावेळी त्यांनी विवो कंपनीला मागे टाकले होते.

- Advertisement -

मात्र, आता हा करार खूप खर्चिक आहे आणि बाजारात टिकून राहण्याच्या दृष्टीने धोकादायक आहे, असे सांगत ओप्पोने स्वतःहूनच या प्रयोजकत्वातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु बीसीसीआयचे नुकसान झालेले नाही, कारण ओप्पो कंपनीकडून जितके पैसे मिळत होते, तितकेच पैसे त्यांना बायजू कंपनीकडून मिळणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -