ब्राझीलचा फुटबॉलपटू पेले याला श्वास घेण्यास त्रास, प्रकृती स्थिर

ब्राझीलचा फुटबॉलपटू पेले याला श्वास घेण्यास त्रास, प्रकृती स्थिर

ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू पेले यांच्या आतड्यात गाठ तयार झाली होती. ही गाठ काढण्यासाठी त्यांचे ऑपरेशन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती सामान्य झाली होती. दरम्यान त्यांची मुलगी केली नेसिमेंटो हिने असे सांगितले की, ते हळूहळू बरा होत आहे. पण अल्बर्ट आइन्स्टाईन हॉस्पिटलने सांगितले की, ८० वर्षीय पेले यांना गुरुवारी रात्री पुन्हा एकदा आपत्कालीन कक्षात श्वास घेण्याच्या किरकोळ समस्यांमुळे दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयाने याबाबत अधिक माहिती दिली नाही. पेले यांच्यावर ४ सप्टेंबर रोजी ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

केली नेसिमेंटोने शुक्रवारी तिच्या वडिलांसोबत एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला, ज्यामध्ये तिने असे सांगितले की हा फोटो नुकताच अल्बर्ट आइन्स्टाईन हॉस्पिटलमधील त्याच्या रूममध्ये काढण्यात आला आहे. ती म्हणाले, ‘पेले हळूहळू बरे होत आहेत आणि प्रकृती सध्या सामान्य आहे. या प्रकारच्या ऑपरेशननंतर, अशा वयाच्या व्यक्तीच्या प्रकृतीत कधीकधी चढ -उतार होत असते. काल त्यांना खूप थकवा जाणवत होता, पण आज त्यांना बरे वाटत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kely Nascimento (@iamkelynascimento)

पेले यांना आपत्कालीन कक्षातून मंगळवारी सर्वसाधारण कक्षात हलवण्यात आले.मात्र अद्याप रुग्णालयाने त्यांच्या प्रकृतीबाबत निवेदन जारी केलेले नाही. पेले यांनी नंतर सोशल मीडियावर त्यांना बरे वाटत असल्याचे सांगितले. तसेच कुटुंबातील सदस्यांनी त्यांना दिवसभरात भेट दिली होती. पेले म्हणाले, ‘मी रोज आनंदी असतो. मला तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. ‘ब्राझीलने पेलेच्या नेतृत्वाखाली १८५८, १९६२ आणि १९७० मध्ये विश्वचषक जिंकला. त्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये ९२ सामन्यात ७७ गोल केले, जे ब्राझीलसाठी एक विक्रम आहे.