घरक्रीडाBrendan Taylor Ban: ब्रेन्डन टेलरविरोधात ICC ची मोठी कारवाई, दिली इतक्या वर्षांची...

Brendan Taylor Ban: ब्रेन्डन टेलरविरोधात ICC ची मोठी कारवाई, दिली इतक्या वर्षांची कठोर शिक्षा

Subscribe

झिम्बाब्वेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ब्रेन्डन टेलरवर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये एका भारतीय उद्योगपतीच्या माध्यमातून स्पॉट-फिक्सिंगबाबत योग्य वेळेत तक्रार दाखल न केल्यामुळे ब्रेन्डन टेलरला साडेतीन वर्षांची कठोर शिक्षा देण्यात आली आहे. याशिवाय कोकेन घेतल्याप्रकरणी डोप चाचणीत अपयश मिळाल्यामुळे आयसीसीने टेलरला एका महिन्यासाठी निलंबित केले आहे.

क्रिकेटमधून साडेतीन वर्षांची कठोर शिक्षा

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेच्या चार तरतुदींचे टेरलने उल्लंघन केले आहे. याआधी माजी क्रिकेटरने त्याच्या अधिकृत ट्विटर हँण्डलवर चार पानांचे पत्र शेअर केले होते. त्यानंतर त्याने संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला होता. दरम्यान आयसीसीच्या प्रतिबंधक संहितेच्या तरतुदींचा भंग केल्यामुळे आणि आयसीसी डोपिंगचा आरोप मान्य केल्यानंतर त्याच्यावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून साडेतीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. परंतु २८ जुलै २०२५ नंतर टेलर क्रिकेट खेळात पुन्हा एकदा सहभाग घेऊ शकतो.

- Advertisement -

व्हिडिओ बनवून मला ब्लॅकमेल केलं…

२५ जानेवारीला ब्रेन्डन टेलरने खळबळजनक आरोप केला होता. ऑक्टोबर २०१९ मध्ये एका भारतीय उद्योगपतीने स्पॉन्सरशिपसाठी आणि चर्चेसाठी मुंबईमध्ये बोलावलं होतं. तसेच जेवणानंतर उद्योगपतीनं मला कोकेन दिलं आणि माझ्या अपरोक्ष माझा व्हिडिओ बनवून मला ब्लॅकमेल केलं, असा आरोप ब्रेन्डल टेलरनं केला होता. ही घटना घडल्यानंतर ब्रेन्डन टेलरने ही बाब आयसीसीला सांगितली होती. त्यानंतर आयसीसीने चौकशी करून ब्रेन्डन टेलरवर बंदी घातली होती.

- Advertisement -

ब्रेन्डन टेलरने शेअर केली पोस्ट

स्पॉट फिक्सिंग केलं नाही तर व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली. ६ जणांनी मला घेरल्यामुळे मला भिती वाटत होती. त्यामुळे त्यांनी दिलेले १५ हजार डॉलर्स मी स्वीकारले आणि भारत सोडला. काम झाल्यावर ते मला २० हजार डॉलर्स देणार होते. परंतु माझ्यावर ताण होता. त्यामुळे कुटुंब सुरक्षित करून मी ६ महिन्यांनी आयसीसीकडे तक्रार केली. आयसीसीची कारवाई मी स्वीकारतो आहे, अशी पोस्ट ब्रेन्डन टेलरने शेअर केली होती.

जागरूकता पसरवा…आर. अश्विनचा सल्ला

जागरूकता पसरवा…बऱ्याचदा पत्त्याच्या एका खेळात टेबलवर आपल्याला अनेक पर्याय दिले जातात. तेव्हा एक तर डाव खेळा किंवा सोडून जा. अशावेळी खेळ सोडून जाणंच योग्य असतं. ब्रेन्डन आणि त्याच्या कुटुंबाला बळ मिळो, असं भारतीय संघाचा फिरकीपटू आर. अश्विनने ट्विट करत म्हटलं होतं.


हेही वाचा : नंदुरबारमध्ये गांधीधाम एक्स्प्रेसला भीषण आग, अग्निशमन दलाचे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -