Brendan Taylor : स्पॉट फिक्सिंगसाठी ब्लॅकमेल केलं, भारतीय उद्योगपतीनं कोकेनं दिलं ; क्रिकेटपटूचा खळबळजनक आरोप

भारतामध्ये पुन्हा एकदा फिक्सिंग प्रकरणाच्या चर्चेला उधाण आलंय. झिम्बाब्वेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ब्रेन्डन टेलरने खळबळजनक आरोप केला आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये एका भारतीय उद्योगपतीने स्पॉन्सरशिपसाठी आणि चर्चेसाठी मुंबईमध्ये बोलावलं होतं. तसेच जेवणानंतर उद्योगपतीनं मला कोकेन दिलं आणि माझ्या अपरोक्ष माझा व्हिडिओ बनवून मला ब्लॅकमेल केलं, असा आरोप ब्रेन्डल टेलरनं केला आहे.

ही घटना घडल्यानंतर ब्रेन्डन टेलरने ही बाब आयसीसीला सांगितली आहे आणि त्यानंतर आयसीसीने चौकशी करून ब्रेन्डन टेलरवर बंदी घातली आहे. स्पॉट फिक्सिंगसाठी १५ हजार डिपॉझिट म्हणून डॉलर्स मिळाले. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर २० हजार डॉलर्स मिळणार होते, अशी कबुली देखील ब्रेन्डन टेलरने दिली आहे.

१५ हजार डॉलर्स मी स्वीकारले आणि भारत सोडला

स्पॉट फिक्सिंग केलं नाही तर व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली. ६ जणांनी मला घेरल्यामुळे मला भिती वाटत होती. त्यामुळे त्यांनी दिलेले १५ हजार डॉलर्स मी स्वीकारले आणि भारत सोडला. काम झाल्यावर ते मला २० हजार डॉलर्स देणार होते. परंतु माझ्यावर ताण होता. त्यामुळे कुटुंब सुरक्षित करून मी ६ महिन्यांनी आयसीसीकडे तक्रार केली. आयसीसीची कारवाई मी स्वीकारतो आहे, अशी पोस्ट ब्रेन्डन टेलरने केली आहे.

आर. अश्विनचा सल्ला

जागरूकता पसरवा…बऱ्याचदा पत्त्याच्या एका खेळात टेबलवर आपल्याला अनेक पर्याय दिले जातात. तेव्हा एक तर डाव खेळा किंवा सोडून जा. अशावेळी खेळ सोडून जाणंच योग्य असतं. ब्रेन्डन आणि त्याच्या कुटुंबाला बळ मिळो, असं भारतीय संघाचा फिरकीपटू आर. अश्विनने ट्विट करत म्हटलं आहे.


हेही वाचा : UP Assembly Election 2022 : आरपीएन सिंह यांचा काँग्रेसमधून तडकाफडकी राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता