घरक्रीडाब्रायन लारा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

ब्रायन लारा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Subscribe

ब्रायन लारा यांना छातीच्या वेदनांमुळे मुंबई येथील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

जगप्रसिद्ध वेस्टइंडीजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा यांना परळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी ब्रायन लारा यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ब्रायन लारा यांच्या छातीत वेदना जाणवू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वेस्ट इंडिज क्रिकेटच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ब्रायन लारा यांची तब्येत उत्तम असल्याचे त्यांनी कळवले आहे. काही काळासाठी त्यांना डॉक्टरांच्या देखरेखी खाली ठेवण्यात आले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ब्रायन लारा हे वेस्ट इंडीज संघातील माजी क्रिकेटपटू आहेत. लारा यांना आक्रमक खेळीचा फलंदाज म्हणून ओळखला जात असे. ब्रायन लारा यांनी अंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार केल्या आहे. सोमवारी ब्रायन लारा यांना छातीत त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्लोबल रूग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी लारा यांच्यावर एन्जियोग्राफी केली आहे. एन्जियोग्राफीनंतर लारा यांना डॉक्टरांच्या देखरेखी खाली ठेवण्यात आले होते. ब्रायन लारा यांची प्रकृती सुधराणा झाल्यावर बुधवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.वेस्ट इंडिज क्रिकेटच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटनुसार, ब्रायन लारा यांनी त्यांची तब्येत उत्तम असल्याचे कळवले आहे. याशिवाय त्यांची प्रकृती सुधारत असल्याचेही सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -