घरक्रीडाEPL Football : टॉटनहॅमला पराभवाचा धक्का; लिव्हरपूल विजयी  

EPL Football : टॉटनहॅमला पराभवाचा धक्का; लिव्हरपूल विजयी  

Subscribe

लिव्हरपूलने वेस्ट हॅमवर ३-१ अशी मात केली.

टॉटनहॅम संघाला इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला. ब्रायटनने त्यांना १-० असे पराभूत केले. यंदाच्या मोसमात टॉटनहॅमचा २० सामन्यांत हा पाचवा पराभव ठरला. त्यांनी आतापर्यंत ९ सामने जिंकले असून प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात ते सहाव्या स्थानावर आहेत. दुसरीकडे लिव्हरपूलला त्यांचा सामना जिंकण्यात यश आले. त्यांनी वेस्ट हॅमवर ३-१ अशी मात केली. त्यांच्याकडून मोहम्मद सलाहने दोन, तर जिनी वाईनआल्डमने एक गोल केला. लिव्हरपूलचा संघ २१ सामन्यांत ४० गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

- Advertisement -

लिअँड्रो ट्रोसार्डचा गोल

टॉटनहॅमला मात्र ब्रायटनविरुद्ध चांगला खेळ करता आला नाही. ब्रायटनने पूर्वार्धात अप्रतिम खेळ केला. त्यांनी टॉटनहॅमच्या बचाव फळीवर दबाव टाकला. याचा फायदा त्यांना १७ व्या मिनिटाला मिळाला. लिअँड्रो ट्रोसार्डने केलेल्या गोलमुळे ब्रायटनला १-० अशी आघाडी मिळाली. उत्तरार्धात टॉटनहॅमने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ब्रायटनने भक्कम बचाव करत हा सामना १-० असा जिंकला. हा त्यांचा २१ सामन्यांत चौथा विजय ठरला. तसेच चेल्सीने बर्नलीवर २-० असा विजय मिळवला. त्यांच्याकडून कर्णधार सेझार अ‍ॅझपिलिक्वेटा आणि मार्कोस अलोन्सो यांनी गोल केले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -