घरक्रीडा10 हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमारला कांस्यपदक

10 हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमारला कांस्यपदक

Subscribe

इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धा २०२२ मध्ये पुरूषांच्या 10 हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत भारतीय धावपटू संदीप कुमारने कांस्यपदक जिंकले आहे. संदीपने 38 मिनिटे 49:21 सेकंदात शर्यत पूर्ण करून तिसरं स्थान पटकावलं आहे. कॅनडाच्या इव्हान्सने 38.37.36 मिनिटांत शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले. दुसऱ्या स्थानावर डिक्लान टिंगे होते, ज्याने 38 मिनिटे 42:33 सेकंदात अंतर कापून रौप्यपदक पटकावले.

- Advertisement -

या स्पर्धेतील आणखी एक भारतीय खेळाडू होता. अमित खत्री 43:04.97 च्या हंगामातील सर्वोत्तम वेळेसह नवव्या स्थानावर राहिला. काल भारताची महिला अॅथलीट प्रियांका गोस्वामीने याच स्पर्धेत रौप्यपदक मिळवलं होतं. तिने 43.38 मिनिटांत 10000 मीटर अंतर कापले होते. प्रियांका पाठोपाठ महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळे याने बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्यपदक भारताला मिळवून दिलं आहे. त्याने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 8:11:20 अशी वेळ नोंदवून रौप्य पदक जिंकलं होतं.

दुसऱ्या आणि तिसऱ्या स्प्लिटमध्ये कॅनडा आणि केनियाच्या खेळाडूंनी आघाडी मिळवली. परंतु 4 हजार मीटरनंतर पुन्हा एकदा संदीप कुमारने आघाडी मिळवली आहे. संदीपने 2015 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 50 किलोमीटर शर्यतीत सहभाग घेतला होता. 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत तो 35 वा आला होता. तर 2020 च्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 20 किमी शर्यतीत 23 वे स्थान पटकावले होते. 20-50 किमी चालण्याच्या शर्यतीत त्याच्या नावावर राष्ट्रीय विक्रम आहेत.

- Advertisement -

दरम्यान, भारताच्या एलडोस पॉल आणि अब्दुल्ला अबूबाकेर यांनी 2 पदके जिंकली आहेत. एलडोस पॉलने 17.03 मीटर अंतर पार करून सुवर्णपदक जिंकले. त्याचवेळी अब्दुल्ला अबूबाकेरने 17.02 मीटर अंतरासह रौप्यपदकावर कब्जा जिंकलं आहे.


हेही वाचा : CWG 2022 : 9 व्या दिवशी भारतावर पदकांचा पाऊस; 4 सुवर्णपदकांसह 14 पदकांची कमाई, पाहा विजेत्यांची


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -