घरक्रीडाबुम बुम बुमराह पुनरागमनासाठी सज्ज

बुम बुम बुमराह पुनरागमनासाठी सज्ज

Subscribe

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आपल्या पाठीच्या दुखापतीमधून सावरतो आहे. जसप्रीतने आपल्या ट्विटर अकाऊंटवर, जिममध्ये वर्कआऊट करतानाचा एक फोटो पोस्ट करत भारतीय संघात पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या दुखापतीबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. बुमराहच्या पाठीच्या दुखापतीला शस्त्रक्रियेची गरज लागणार नसल्याचे समोर आले होते.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत बुमराहला दुखापतीमुळे संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रियेची गरज नसल्याचा अहवाल दिल्यानंतर, आगामी काळात बुमराह संघात लवकरच पुनरागमन करु शकतो. २०२० साली भारताच्या न्यूझीलंड दौर्‍यापर्यंत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनीही बुमराहच्या तब्येतीच्या घडामोडींवर समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisement -

विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज दौर्‍यात कसोटी मालिकेदरम्यान बुमराहला ही दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळालेले नव्हते. आपल्या पाठीच्या दुखण्यावर उपचारासाठी बुमराह बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकासोबत इंग्लंडलाही गेला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -