घरक्रीडाबुमराह टीम इंडियातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू

बुमराह टीम इंडियातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू

Subscribe

इरफान पठाणची स्तुतीसुमने

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत बुमराहने १३ गडी बाद केले. या मालिकेतील दुसर्‍या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने हॅट्ट्रिकसह ६ विकेट्स मिळवल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक मिळवणारा बुमराह हा हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांच्यानंतर केवळ तिसरा भारतीय गोलंदाज आहे. तसेच या मालिकेतील कामगिरीमुळे त्याने जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानी झेप घेतली आहे. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल इरफान पठाणने त्याचे कौतुक केले आहे.

बुमराह भारतीय क्रिकेट संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे, असे मला वाटते. बुमराह जेव्हा भारताच्या संघात नसतो, तेव्हा त्यांचे खूप नुकसान होते. तो या संघाचा खूपच मौल्यवान सदस्य आहे. बुमराहसारखा गोलंदाज संघात असणे हे भारताचे भाग्य आहे. भारतीय संघाने त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. तो एक असा गोलंदाज आहे, जो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी-२०) यश मिळवतो, असे इरफान म्हणाला.

- Advertisement -

इरफानने २००६ साली पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पहिल्या षटकात हॅटट्रिक मिळवली होती. त्या हॅटट्रिकविषयी इरफानने सांगितले, मी त्यावेळी खूप खुश होतो, कारण तुम्हाला प्रत्येक सामन्यात हॅटट्रिक मिळत नाही. काही खेळाडू त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत एकही हॅटट्रिक मिळवत नाहीत. त्यामुळे जेव्हा तुम्ही ही कामगिरी करता, तेव्हा तुम्ही काहीतरी खास गोष्ट केलेली असते. बुमराह त्याच्या कारकिर्दीत पुन्हा हॅटट्रिक घेईल, याची मला खात्री आहे.

‘तो’ यशस्वी होईल याची खात्री होती -युवराज

जसप्रीत बुमराहसारखे गोलंदाज वारंवार घडत नाहीत आणि त्याच्यासारखा दुसरा गोलंदाज जगात नाही, अशा शब्दांत भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने बुमराहची स्तुती केली. बुमराह फारच उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याच्यासारखे गोलंदाज वारंवार घडत नाहीत. मी सर्वात आधी त्याच्याविरुद्ध २०१३ मध्ये रणजी करंडकात मोहाली येथे झालेल्या गुजरातविरुद्धच्या सामन्यात खेळलो होतो. त्याने माझ्याविरुद्ध चार अप्रतिम षटके टाकली. तेव्हाच मला अंदाज आला होता की, तो भारताला कसोटी क्रिकेटमध्ये बरेच सामने जिंकवणार, असे युवराज म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -