घरक्रीडाBWF Rankings : भारतीय खेळाडूंना क्रमवारीत मोठा फायदा; किदांबी दोन वर्षांनंतर टॉप...

BWF Rankings : भारतीय खेळाडूंना क्रमवारीत मोठा फायदा; किदांबी दोन वर्षांनंतर टॉप १० मध्ये, लक्ष्यसहीत प्रणॉयचेही वर्चस्व

Subscribe

स्पेनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी चमकदार कामगिरी केली

स्पेनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी चमकदार कामगिरी केली. पुरुष गटात भारताला दोन पदके मिळाली. किदांबी श्रीकांतने रौप्य तर लक्ष्य सेनने कांस्यपदक जिंकले. दरम्यान लक्षणीय बाब म्हणजे एचएस प्रणॉयचे पदक हुकले असले तरी त्याला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले. याशिवाय पी.व्ही सिंधूनेही महिला गटात उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. विश्व चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदाच पदक जिंकणाऱ्या २० वर्षीय लक्ष्य सेनने देखील दोन पाऊले उडी घेत १७ व्या स्थानी मजल मारली आहे. यासोबतच एचएस प्रणॉयने देखील चांगलीच मुसंडी मारून २६ व्या स्ठानी जागा मिळवली आहे.

भारतीय खेळाडूंच्या शानदार खेळीचा निकाल त्यांच्या क्रमवारीतून समोर आला आहे. विश्व चॅम्पियनशिपच्या (बीडब्ल्यूएफ) ताज्या क्रमवारीतील पहिल्या ४ खेळाडूंना मोठा फायदा झाला आहे. माजी अव्वल स्थानावरील खेळाडू किदांबी श्रीकांत पुन्हा एकदा टॉप १० मध्ये आला आहे. तो सध्या १० व्या स्थानी विराजमान आहे.

- Advertisement -

दरम्यान, इतर भारतीय बॅडमिंटन खेळाडू बी साई प्रणीतची दोन तर समीर वर्माची एका स्थानावरून घसरण झाली आहे. मात्र तरीदेखील दोन्हीही खेळाडूंचा पहिल्या २५ खेळाडूंच्या यादीत समावेश आहे.

- Advertisement -

महिला खेळाडूंच्या क्रमवारीत पी.व्ही सिंधूच्या क्रमवारीत कोणताच बदल झाला नाही आणि ती सातव्या स्थानावर कायम आहे. तर सायना नेहवाल देखील २५ व्या स्थानावर कायम आहे. महिला दुहेरी क्रमवारीत भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांना एका स्थानाचा फायदा झाला असून ते २० व्या स्थानावर आहेत.

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -