घरक्रीडाBWF World Championship : फायनलमध्ये पोहोचणारा श्रीकांत पहिला भारतीय पुरुष खेळाडू; उपांत्य...

BWF World Championship : फायनलमध्ये पोहोचणारा श्रीकांत पहिला भारतीय पुरुष खेळाडू; उपांत्य फेरीत लक्ष्यचा केला पराभव

Subscribe

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत पहिला भारतीय पुरूष खेळाडू बनला आहे ज्याने बीएफडब्ल्यू वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत पहिला भारतीय पुरूष खेळाडू बनला आहे ज्याने बीएफडब्ल्यू वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. जो या स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. श्रीकांतच्या अगोदर पी.व्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांनी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला आहे. दरम्यान, श्रीकांतने उपांत्यफेरीच्या सामन्यात भारताच्याच लक्ष्य सेनला चितपट केले. या सामन्यात श्रीकांत पहिल्या सेटमध्ये पराभूत झाला होता. मात्र त्यानंतर त्याने चमकदार कामगिरी करत शेवटच्या दोन्हीही सेटमध्ये विजय मिळवला आणि फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला. आता श्रीकांतसाठी किमान रौप्य पदक जिंकणे हे निश्चित झाले आहे.

दरम्यान, उपांत्यफेरीतील सामन्याची सुरूवात बरोबरीने चालू होती. मात्र, नंतर लक्ष्यने आघाडी घेत पहिला गेम २१-१७ ने आपल्या नावावर केला. त्यानंतर श्रीकांतने दुसऱ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन करून २१-१४ ने विजय मिळवला. तर तिसऱ्या सेटमध्ये देखील दोन्ही खेळाडू बरोबरीत होते पण शेवटच्या काही क्षणांना श्रीकांतने शानदार खेळी करून तिसऱ्या सेटमध्ये २१-१७ ने विजय मिळवला आणि फायनलचे तिकिट निश्चित केले.

- Advertisement -

लक्ष्य आणि श्रीकांत पहिल्यांदाच उपांत्य फेरीत पोहोचले होते

श्रीकांत आणि लक्ष्य हे दोघेही पहिल्यांदाच या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचले होते. ही कामगिरी करणारा लक्ष्य हा चौथा भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, प्रकाश पादुकोणने १९८३ मध्ये, तर बी साई प्रणीत आणि श्रीकांतने २०१९ मध्ये हा कारनामा केला होता. लक्ष्य यासोबतच बीएफडब्ल्यू वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा सर्वात युवा खेळाडू बनला आहे. दरम्यान आता २ पदकांसहीत भारताच्या नावावर या स्पर्धेत एकूण १२ पदक झाली आहेत. प्रकाश, साई प्रणीत, श्रीकांत आणि लक्ष्य याव्यतिरिक्त पी.व्ही सिंधूने पाच पदके जिंकली आहेत. तर, सायना नेहवालच्या नावावर दोन पदकांची नोंद आहे. ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने २०११ मध्ये कांस्यपदक जिंकले होते.

- Advertisement -

हे ही वाचा : http://Ashes 2021 AUS vs ENG : पिंक-बॉल कसोटीत ही कामगिरी करणारा पहिला गोलंदाज ठरला मिचेल स्टार्क


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -